जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुका कृषी विभागाची सोयाबीन कार्यशाळा संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर व धामोरी ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बीज प्रक्रिया शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.मात्र लागवड पद्धतीत सदोषता असल्याने उत्पादन घटत आहे.त्या बाबी टाळण्यासाठी कृषी विभागाने गावोगाव सोयाबीन कृषिशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम केले आहे.त्यातूनच हा उपक्रम कोपरगाव तालुक्यात कृषी विभागाने नुकताच धामोरी व मंजूर या ठिकाणी राबवला आहे.

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात.अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत.कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.मात्र लागवड पद्धतीत सदोषता असल्याने उत्पादन घटत आहे.त्या बाबी टाळण्यासाठी कृषी विभागाने गावोगाव सोयाबीन कृषिशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम केले आहे.त्यातूनच हा उपक्रम कोपरगाव तालुक्यात कृषी विभागाने नुकताच धामोरी,व मंजूर या ठिकाणी राबवला आहे.

सदर प्रसंगी कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर पवार व कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत डरांगे यांनी मार्गदर्शन केले मंजूर येथे सोयाबीनची बीज प्रक्रिया तसेच रासायनिक खतांसह अठरा इंचावर पेरणी करताना कृषी सहाय्यक,पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
धामोरी येथे सोयाबीन शाळा प्रगतशील शेतकरी भगवानराव माळी यांच्या शेतात पार पडली यावेळी सोयाबीन बीज प्रक्रिया,खत व्यवस्थापन व बी.बी.एफ. द्वारे तसेच अठरा इंचावर पेरणी करण्याबाबत शेती तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव मंडळ कृषी अधिकारी मनोज सोनवणे,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,संजय बोंबे यांनी मार्गदर्शन केले आहे.या शेतीशाळेस कैलास माळी,विलास माळी,विजय जाधव,राहुल मांजरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close