जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेने बेकायदा नळ जोडण्या तोडल्या !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराजवळ असलेल्या बनसाड वस्ती भागात असलेले वीस बेकायदा नळजोडण्या आज कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वतः अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जाऊन तोडल्या आहेत.या भागात नगरपरिषदेत अधिकृत नोंद असलेले चौदा नळजोड असून वीस नळजोड हे अनेक वर्षांपासून बेकायदा जोडून घेऊन पाणी चोरून वापरत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडॆ आल्या होत्या.त्यांच्या या धाडसी कृतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव पालिकेला एकूण वार्षिक जलसाठा २१० द.ल.घ.फूट मंजूर असताना त्याच्या निम्माच जलसाठा वापरण्यात येत असताना जाणीवपूर्वक पाणी नसल्याची आवई उठवून राजरोस चोऱ्या करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या होत्या.हे अतिरिक्त पाणी आपल्या उद्योगांना वापरण्याचे षडयंत्र राबवले जात होते व नगरपरिषदेच्या सत्तेत बसणारे त्यांना साथ देत होते.त्याचा आमच्या प्रतिनिधीने त्या-त्या वेळी भंडाफोड केला होता.व या विषयावरूनच कोपरगाव विधानसभा निवडणूक गाजली होती.

कोपरगाव नगरपरिषदेत हद्दीत पाणी समस्या हि मोठी तीव्र बनली आहे.याला कारण फक्त नियोजनाचा अभाव असल्याची विश्वसनिय माहिती आहे.जलसंपदा विभागाकडून येणारे पाणी व नागरिकांसाठी होणारा पाण्याचा वापर याचा ताळमेळ लागत नाही.शिल्लक पाणी मोठ्या प्रमाणात कागदोपत्री दिसते मात्र नागरिकांना मात्र एकवीस दिवसाआड पाणी मिळण्याचा प्रताप या पालिकेत नोंदवला गेला आहे.कोपरगाव पालिकेला एकूण वार्षिक जलसाठा २१० द.ल.घ.फूट मंजूर असताना त्याच्या निम्माच जलसाठा वापरण्यात येत असताना जाणीवपूर्वक पाणी नसल्याची आवई उठवून राजरोस चोऱ्या करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या होत्या.हे अतिरिक्त पाणी आपल्या उद्योगांना वापरण्याचे षडयंत्र राबवले जात होते व नगरपरिषदेच्या सत्तेत बसणारे त्यांना साथ देत होते.त्याचा आमच्या प्रतिनिधीने त्या-त्या वेळी भंडाफोड केला होता.व या विषयावरूनच कोपरगाव विधानसभा निवडणूक गाजली होती.अवैध नळजोडण्या असाच जुना रोग आहे.अवैध नळजोडण्या शहरात आणि शहराबाहेर शेकड्याने आहेत.अनेक कर्मचाऱ्यांनी परस्पर रकमा हडप केल्याच्या नोंदी व तक्रारी पालिकेच्या सभेत अनेकवेळा झालेल्या आहेत.त्या बाबत कारवाई करण्यास आजपर्यंत कोणीच धजत नव्हते ते धाडस नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दाखवले आहे.

आज राबविलेल्या कारवाईत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना पाणी पुरवठा अभियंता श्रीमती पाटील मॅडम,अभियंता चाकणे,लिपिक भाऊराव वायखिंडे,रविंद्र वाल्‍हेकर,नारायण साबळे व इतर कर्मचाऱ्यांसह जाऊन साथ दिली आहे.अनेक वर्षे नगरपरिषदेची सत्ता भोगतांना आर्थिक गैरव्यवहार करून त्या त्या वेळचे लोकप्रतिनिधी,काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे आर्थिक नुकसानही केले आहे.शहरातही अनेक बेकायदा नळजोड दिलेले आहेत.जमिनीखालून दिलेले बेकायदा नळजोड शोधणे कठिण आहे.अनेक रस्ते खोदावे लागणार आहेत. तरीही तो विषय सोडलेला नाही. मुख्य जलवाहिनीवरील नळजोड उपनळजोडणीला जोडण्याचे नियोजनही सुरू आहे.काही आजी माजी नेते,लोकप्रतिनिधी,जबाबदार कार्यकर्ते यांनी स्वतःहून मुख्य नळ जोडणीवरील नळजोड काढून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावरही हि संक्रात येऊ शकते.त्यांनी सावध होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close