कोपरगाव तालुका
विजेने घेतला शिरसाच्या झाडाचा बळी
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी आणि कोळगाव थडी ह्या दोन गावांच्या मध्यावर दुपारी चार वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीच्या बाधांवर असलेल्या शिरसाच्या झाडावर अचानक पाऊस नसतानाही वीज पडली व मोठा आवाज झाला परीसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही अनर्थ टळला आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वर्तमानात पावसाळा वेळेआधी सुरु झाला असून विजांच्या कडकडासह हजेरी लावत आहे.अनेक ठिकाणी तो आपत्ती बनून तर काही ठिकाणी शेतीसाठी सहाय्यक बनून समोर येत आहे.कोपरगाव तालुक्यात वरील ठिकाणी त्याने आपला हा वेगळा प्रताप दाखवला आहे.मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.