कोपरगाव तालुका
कोपरगावात तिरट भोवले,आठ जणांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या खडकी हद्दीत सप्तशृंगी माता मंदिराच्या डाव्या बाजूच्या उघड्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन त्यांनी टाकलेल्या धाडीत आज दुपारी पावनेपाच वाजेच्या सुमारास त्याच खडकी भागातील आरोपी युनूस इक्बाल शेख (वय-३४),परशुराम पिराजी सोनवणे (वय-२२),गणेश सर्जेराव शेळके (वय-२१),सादिक शब्बीर शेख (वय-(३७),राजेंद्र नारायण देवकर (वय-४२),गणेश पिराजी सोनवणे (वय-२७),तौफिक गुलाम तांबोळी (वय-३०),सुनील सुरेश भालेराव (वय-३०),आदी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे जुगारी नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सरकारने टाळेबंदीतून मुक्ती मिळाल्याचा काही जण गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.खडकी या उपनगरात काही नागरिक आपला कामधंदा शोधण्याऐवजी घरात असलेला सर्व पैसा जुगारावर उधळताना दिसत आहे.अशीच एक खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक या ठिकाणी रवाना झाले असताना त्यांना वरील ठिकाणी सप्तशृंगी मंदिरानजिक असलेल्या शेडमध्ये काही नागरिक तिरट खेळताना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
वर्तमानात कोरोनाचा कहर सुरु असून तो थांबण्याचे नाव घेत नाही.याचा प्रशासनावर मोठा तणाव आहे.यातच शासनाने नागरिकांना आपली रोजी रोटी सुरु करता यावी व दोन घास सुखाचे खाता यावे या साठी टाळेबंदीतून सुटका दिली असताना या टाळेबंदीतून मुक्ती मिळाल्याचा काही जण गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.खडकी या उपनगरात काही नागरिक आपला कामधंदा शोधण्याऐवजी घरात असलेला सर्व पैसा जुगारावर उधळताना दिसत आहे.अशीच एक खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक या ठिकाणी रवाना झाले असताना त्यांना वरील ठिकाणी सप्तशृंगी मंदिरानजिक असलेल्या शेडमध्ये काही नागरिक कोरोना या विषाणूची साथ सुरु असल्याची माहिती असताना आपल्या तोंडाला कुठलीही मुखपट्टी बांधली नसताना तिरट नावाचा जुगार खेळात असताना आढळून आले आहे.पोलिसानी त्यांच्यावर धाड टाकून त्यांना जागेवरच पकडून ठेवले असून त्यांच्यावर गु.र.नं.२०६/२०२० मुंबई जुगार कायदा कलम १२(अ)सह भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,३४ प्रमाणे वरील आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडील पत्याच्या कॅटसह ६ हजार ७६८ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.