जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वसंतराव चव्हाण यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवड करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव( प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेवर आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण( कोल्हापूर) यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाजाच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बारामती येथे गोविंदबाग येथे वसंतराव चव्हाण यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता समाजाचे नेते व नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण (कोल्हापूर) यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी व तमाम समाजाला न्याय द्यावा.वसंतराव चव्हाण हे राज्य पुरस्कार मिळालेले आदर्श शिक्षक असून अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.तसेच बहिर्जी नाईक चित्र संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात तमाम रामोशी समाज हा नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ या राज्यव्यापी संघटनेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात सर्व क्षेत्रात मोठ्या संख्येने काम करत असून समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभेत सध्याच्या विद्यमान सरकारचे प्रामाणिकपणे काम केले. कोणतीही अभिलाषा ठेवली नाही.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता काम केले.तसेच शरद पवार यांनी बारामती येथे गोविंदबाग येथे वसंतराव चव्हाण यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता समाजाचे नेते व नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण (कोल्हापूर) यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी व तमाम समाजाला न्याय द्यावा.वसंतराव चव्हाण हे राज्य पुरस्कार मिळालेले आदर्श शिक्षक असून अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.तसेच बहिर्जी नाईक चित्र संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून राज्यात सर्व शिक्षण अभियानात त्यांनी काम केलेले आहे.तरी वसंतराव चव्हाण यांची विधान परिषदेवर निवड करावी अशी मागणी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य सरचिटणीस राजकुमार गडकरी प्रवक्ते देवरावजी गुळवे,संघटक बंडोपंत खर्डे,सोमनाथ गोफणे,जिल्हाअध्यक्ष संजय शिरतार,संजय चव्हाण,राजु गुरूकुले,साहेबराव गुरुकुले,शिवाजी गडकरी,सिताराम जेडगुले,ज्ञानेश्वर गुरुकुले,संतोष शिरतार, सुभाष जेडगुले,तानाजी शिरतार,रावसाहेब गुळवे,आदींनी एका निवेदनाद्वारे केली असून हे निवेदन माननीय शरद पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ना.बाळासाहेब थोरात व ना.हसन मुश्रीफ आदींना पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close