जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देर्डे–कोऱ्हाळे,पोहेगाव,चांदेकसारे,डाऊच खु.जेऊर कुंभारी,कोकमठाण,भोजडे,धोत्रे आदी ठिकाणी सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या अडचणी आ.आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या होत्या याअडचणी दूर करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी नुकतीच कोपरगाव येथे संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार या अडचणी लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे निर्माण झालेल्या विजेच्या, तारांच्या,रस्ते आदी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.निर्माण झालेल्या व अनावधानाने झालेल्या अडचणी दूर कराव्या.समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना बुजल्या गेलेल्या चाऱ्या पुन्हा उकरल्या असल्या तरी काही चाऱ्या अद्यापही उकरल्या नसल्यामुळे या चाऱ्या उकरून द्याव्या.अलाईनमेंटमध्ये झालेल्या बदलामुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा,डिझाईनमध्ये समाविष्ठ न झालेल्या चाऱ्यांचा समावेश करून युटिलिटी डक्ट तयार करावे,विजेचे खांब लवकरात लवकर इतर ठिकाणी स्थलांतरीत करावे-आ. काळे


समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ज्या गावात समृद्धी महामार्ग जात आहे त्या गावातील रस्त्यांची उंची वाढल्यामुळे खाली आलेल्या वीजवाहिन्या, बुजलेल्या वितरिका (चाऱ्या),समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौण खनिज,काँक्रिट,स्टील आदी साहित्याची वाहतूक करतांना खराब झालेले रस्ते, भूसंपादन करतांना झालेल्या त्रुटी याबाबत आ.आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,पाटबंधारे विभाग,महावितरण व गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकाऱ्यांसमवेत एकत्रित बैठक घेतली.या बैठकीत समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे निर्माण झालेल्या विजेच्या, तारांच्या,रस्ते आदी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.निर्माण झालेल्या व अनावधानाने झालेल्या अडचणी दूर कराव्या.समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना बुजल्या गेलेल्या चाऱ्या पुन्हा उकरल्या असल्या तरी काही चाऱ्या अद्यापही उकरल्या नसल्यामुळे या चाऱ्या उकरून द्याव्या.अलाईनमेंटमध्ये झालेल्या बदलामुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा,डिझाईनमध्ये समाविष्ठ न झालेल्या चाऱ्यांचा समावेश करून युटिलिटी डक्ट तयार करावे,विजेचे खांब लवकरात लवकर इतर ठिकाणी स्थलांतरीत करावे अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आ.काळे यांनी दिल्या. ठेकेदार करीत असलेल्या दिरंगाई मुळे कोकमठाण सबस्टेशन सुरु करण्याबाबत होत असलेला उशीर त्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तंबी देवून हे सबस्टेशन तातडीने सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे बांगर यांनी खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करून ते रस्ते पूर्ववत करून देण्याबाबत रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याचे प्रकल्प व्यवस्थापक ताताराव डूंगा यांना दिल्या. बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून शेतकरी व नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या अशी सक्त ताकीद आ.काळे यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता बागडे
या बैठकीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता बागडे,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गोसावी,समृद्धी महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक ताताराव डूंगा,पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दिघे आदी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close