जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात पोलिसांची धाड,७० हजारांचे गोवंश जप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज सकाळीच साडे सहाच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसानी संजयनगर परिसरात टाकलेल्या धाडीत चार मोठी गोवंश जनावरे व बारा लहान आदी मिळून ७० हजार रुपये किमतीचे बेवारस स्थितीत असलेली सोळा गोवंश जनावरे जप्त केली असून आरोपी असिफ सलीम शेख (वय-३०) रा.आयेशा कॉलनी,कोपरगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी अटक केला आहे.

दरम्यान या घटनेत मूळ आरोपी हा एका या भागातील नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींचा जवळचा नातेवाईक होता मात्र यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले हात ओले करून यातील मूळ आरोपी बदलून मूळ आरोपीने आपल्या चालक कर्मचाऱ्याचा मुलाचा बळी दिल्याची या भागात जोरदार चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.यामुळे शहर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात गोवंश कत्तल मोठ्या प्रमाणावर सुरु असते तीन वर्षा पूर्वी तर ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथून येऊन गुन्हे अंवंशन विभागाने मोठी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला होता.त्या नंतरही या धाडी वारंवार सुरु असताना हा गोवंश हत्येचा क्रूर प्रकार थांबण्याचे अद्याप नाव घेत नाही.आज सकाळी बैल बाजार रस्त्याच्या पूर्वेस भंगार मार्केटच्या मागे बरीच गोवंश जनावरे कत्तली साठी जमा केली असल्याची गोपनीय माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड व सुरजकुमार जीवन अग्रवाल यांच्या पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी लहान मोठी पंधरा जनावरे आढळून आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी असिफ सलीम शेख याचे विरुद्ध गु.र.नं.२०५/२०२० भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१),(ह)व महा.प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम कलम १९९५चे कलम ५(ब)९,भा.द.वि.४२९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपी असिफ शेख पोलिसानी अटक केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close