जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

साई संस्थानच्या…या कर्मचाऱ्यांचा,’उत्‍कृष्‍ट कर्मचारी’ म्‍हणुन सत्‍कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थानचे जानेवारी-२०२३ चे उत्‍कृष्‍ट विभाग प्रमुख व उत्‍कृष्‍ट कर्मचारी म्‍हणुन मुख्‍यलेखाधिकारी तथा प्र.प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे व प्र.लेखाधिकारी साहेबराव लंके यांचा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला आहे.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था,शिर्डीच्‍या अंतर्गत विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्‍या कामात गुणवत्‍ता,सुधारणा व संयमता यावी या उद्देशाने जानेवारी २०२३ पासुन प्रत्‍येक महिन्‍याला उत्‍कृष्‍ट विभाग प्रमुख व उत्‍कृष्‍ट कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍याचा कार्यक्रम संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सुरु केला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यामध्‍ये रुग्‍णालयाचे डॉक्‍टर्स,परिचारीका-परिचारक,संरक्षण विभागाचे प्रामाणिकपणे काम करणारे संरक्षण कर्मचारी तसेच संस्‍थानचे सर्वच विभागांचे कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.हा सत्‍कार कार्यक्रम प्रत्‍येक महिन्‍याला आयोजित करण्‍यात येणार असून कर्मचा-यांनी केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कामाची नोंद त्‍यांच्‍या सेवा पुस्‍तकात घेतली जाणार आहे.यामुळे विभाग प्रमुख्‍य व कर्मचा-यांमध्‍ये सकारात्‍मकता वाढविण्‍यासाठी व नाविण्‍यपुर्ण काम करण्‍याची स्‍पर्धा निर्माण होणार आहे.

त्‍याअनुषंगाने जानेवारी महिन्‍याचा उत्‍कृष्‍ट विभाग प्रमुख म्‍हणुन लेखाशाखा विभागाचे मुख्‍यलेखाधिकारी तथा प्र.प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे व उत्‍कृष्‍ट कर्मचारी म्‍हणुन प्र.लेखाधिकारी साहेबराव लंके यांनी सत्‍काराचा सन्‍मान मिळवला असून त्‍यांनी संस्‍थानचे सर्व विभागांचे अंदाजपत्रक अगदी वेळेत व अचुक सादर करण्‍याचे उत्‍कृष्‍ट काम केले आहे.त्‍यानुसार जानेवारी २०२३ चे उत्‍कृष्‍ट विभाग प्रमुख व उत्‍कृष्‍ट कर्मचारी म्‍हणुन संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला आहे.

सदरचा कार्यक्रम हा काल दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता साईसभागृहात आयोजित करण्‍यात आला होता.
सदर कार्यक्रमास संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे,दिलीप उगले,संजय जोरी,उप-कार्यकारी अभियंता बी.डी.दाभाडे,संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी आदींसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close