कोपरगाव तालुका
कोपरगावात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव लायन्स क्लब,भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह,समता चॅरीटेबल ट्रस्ट,सोनतारा भन्साळी ट्रस्ट,साईबाबा पालखी सोहळा यांचेसह कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना,संस्था,गणेशोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास आज सकाळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे.व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या युवकांचे आभार मानले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळते.त्यामुळे हे पुण्याचे काम असून आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी केले पाहिजे.सध्या निर्माण झालेल्या कोरोना साथीशी चांगल्या प्रकारे कोपरगावकर संघर्ष करीत असून येथून पुढेही स्वत:सोबत परिवाराची व आपल्या देश बांधवांची काळजी घ्यावी-ओमप्रकाश कोयटे-अध्यक्ष,समता चॅरिटेबल ट्रस्ट
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार १२९ ने वाढून ती १ लाख ८२ हजार ९९० इतकी झाली असून ५ हजार १८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६५हजार १६८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार १९७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०८ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे,मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता या संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांना रक्तदानाचे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत कोपरगावात विविध संघटनांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजेपासून रक्तदानासाठी हजेरी लावली होती.
या उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील आनंद ऋषीजी ब्लड बँक,श्री साईबाबा संस्थान रक्तपेढी,संजीवनी ब्लड बँक,अर्पण ब्लड बँक आदि ब्लड बँकांतील डॉक्टर्स,परिचारिका यांनीही सहभागी होत विशेष सहकार्य केले. विशेषत:कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे, कोपरगाव पोलिस स्टेशनचे पी.एस.आय.भरत नागरे या प्रशासकीय अधिकार्यांनीही रक्तदान करून सहभाग नोंदविला. तसेच पोलीस, जवान, डॉक्टर, नगरपालिका विभागातील कर्मचारी आदींनी देखील उत्स्फूर्तपणे स्वत: येऊन रक्तदान केले. या प्रसंगी रक्तदात्यांमध्ये कोपरगाव शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता. या रक्तदानाच्या निमित्ताने ५५५ पिशव्या रक्त संकलन झाले आहे.
या प्रसंगी शिर्डी मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे,कोपरगाव मतदार संघाचे आ.आशुतोषद काळे,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, बँकिंग तज्ज्ञ कैलास ठोळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी समक्ष येऊन भेटी दिल्या आहेत.
या रक्तदान सोहळा यशस्वितेसाठी भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह,समता चॅरीटेबल ट्रस्ट,सोनतारा भन्साळी ट्रस्ट,साईबाबा पालखी सोहळा यांचेसह कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना,संस्था,गणेशोत्सव मंडळ यांनी सहभागी होऊन परिश्रम घेतले आहे.त्यांचे राजेश ठोळे,संदीप कोयटे,अरविंद भन्साळी,राहूल अमृतकर,सुनील फंड यांनी आभार मानले आहे.