जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एस.टी.ची आता माल वाहतूक सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगाराने आता आपल्या प्रवासी वाहतुकीबरोबरच आता माल वाहतूक करण्याची घोषणा अमलात आणण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी कोपरगाव आगारातून पहिल्यांदाच पाच टन वजनाच्या शंभर गोण्या सिमेंट घेऊन येवला तालुक्यातील पाटोदा या गावी जाणाऱ्या वाहनाला कोपरगाव आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम ग्राहक बापूसाहेब बोरणारे नारळ फोडून हिरवा कंदील दिला आहे.आता आगामी काळात शेतमाल वाहतूक करण्याचा त्यांचा इरादा असल्याने खाजगी माल वहातुक व्यवस्थेला पर्याय निर्माण झाला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची माल वाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते.शिवाय महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे.आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या माल वाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्री यांनी घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळ आता माल वाहतूक सेवा सुरु करणार असून गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार असल्याची घोषणा राज्याच्या तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी पंधरा दिवसा पूर्वी केली होती.यात महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाय योजना सध्या राबविण्याचा एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे माल वाहतूक करणे,विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची माल वाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले होते.शिवाय महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे.आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या माल वाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री रावते यांनी घेतला होता.त्या आधारे रेल्वे माल वाहतुकीच्या धर्तीवर आता एस.टी.चीही माल वाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.माल वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळ मोठ्या प्रमाणात फायद्यात येणार आहे.त्याची सुरुवात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी माल वाहतुकीचे प्रथम ग्राहक बापूसाहेब गंगाधर बोरणारे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे.त्यावेळी कोपरगाव आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अमोल बनकर,वाहतूक निरीक्षक राजेंद्र खंडीझोड,वाहतूक नियंत्रक उदय रोकडे,चालक सुभाष दुशिंग,आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close