कोपरगाव तालुका
निघोज नागरी पतसंस्थेला दोन कोटी पंचवीस लाखांचा नफा
संस्थेचे अध्यक्ष वसतंराव कवाद यांची माहीती
पिंपळनेर( प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2018-2019या आर्थिक वर्षात दोन कोटी पंचवीस लाख रुपयाचा नफा झाला असल्याची माहिती निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीविषयी बोलताना श्री. कवाद म्हणाले,16392सभासद असणार्या या पतसंस्थेचे तीन कोटी चौदा लाख रुपये भागभांडवल आहे.तर चौदा कोटी अठ्ठावन्न लाखाचा निधी आहे. चालु अर्थिक वर्षात संस्थेकडे 102कोटी 57लाख रुपयाच्या ठेवी जमा आहेत. संस्थेने शासकिय नियमानुसार 50कोटी 58लाख रुपयाची गुंतवणुक केली तर व्यवसाय, लघु उद्योजक, छोटे व्यापारी, शेती पुरक व्यवसायिक आदींना 71कोटी56लाखांचे कर्ज वाटप केले आहे.संस्थेकडे2कोटी 74लाख रुपयाची मालमत्ता असुन थकबाकीचे प्रमाण4.98टक्के तर नेट एन पी ए 3टक्के आहे.
संस्था iso :9001-2015 प्रमाणित असुन सभासदांसाठी ए टी एम सुविधा उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था आहे.RTGS/NEFT द्वारे रक्कम पाठवणे, कोअर बँकिंग,मोबाईल वरून खाते पाहणे,मोबाईल बँकिंग सुविधा,एस एम एस सुविधा ,दररोज सोनेतारण कर्ज सुविधा आदी सुविधा या पतसंस्थेने सभासद व ग्राहकांच्या हितासाठी सुरु केल्या आहेत. माहीती व तंत्रज्ञानाच्या युगात पंतसंस्थेने प्रगतीकडे वाटचाल केली असुन संस्थेचे संस्थापक स्व. बाबासाहेब कवाद यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज सभासद, ठेविदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या पाठबळावर व विश्वासावर वटर्वक्षात रुपांतर झाले आहे. भविष्यातही या पतसंस्थेकडुन सभासदांच्या हितासाठी विविध योजना राबविण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके यांनी केले आहे.