कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील ..या रस्त्याचे काम सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी तर राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरातील ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अहम भूमिका निभावणाऱ्या वारी-पुणतांबा राज्य मार्गाचे रस्ता (रा.मा. ३६) ते वारी रस्त्याचे स्थानिक विकास निधीतून १४.९९ लाख रुपये खर्च करन करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर, प्रसाद साबळे, ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, महेंद्र बागुल, संजय जाधव, रमेश वाकचौरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, श्री. दहीफळे आदी सोशल डिस्टन्सिंग पाळुन उपस्थित होते.