जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर दोन महिन्यानंतर होणार खुले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यातील जनतेला बावीस मार्च पासून जखडून टाकलेल्या टाळेबंदीतून नागरिकांना उद्या शुक्रवार दि.२२ मे पासून सुटका होणार आहे.शासनाने सांगितलेले अटी व शर्ती नुसार कोपरगांव शहरातील बाजारपेठ सकाळी ९ वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.नागरिकांना मात्र आपल्या जीवनात अजून काही काळ तरी मुखपट्ट्या आणि सुरक्षित अंतराचा नियम मात्र पाळावा लागणार आहे.त्या बाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक पन्नास टक्के आसन क्षमतेने सुरू होत असून त्यानुसार कोपरगाव आगारातुन दि २२ मे पासून अहमदनगर,श्रीरामपूर,संगमनेर या शहरांसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.वेळ व फेऱ्या पुढीलप्रमाणे-कोपरगाव-अहमदनगर-६ फेऱ्या वेळ सकाळी -७, ७.३०,८,दुपारी १२.३०, ०१,०१.३०,कोपरगाव-संगमनेर- ४ फेऱ्या वेळ-०७, १०, दुपारी-०४,०४,कोपरगाव-श्रीरामपूर- ४ फेऱ्या,वेळ- ०७,१०, दुपारी-०१,०४ वाजता सोडण्यात येणार आहे.सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.दरम्यान प्रवासा दरम्यान व बस स्थानकावर प्रवाशांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे-कोपरगाव आगार व्यवस्थापक-अभिजित चौधरी

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार २९३ ने वाढून ती १ लाख १३ हजार ३२१ इतकी झाली असून ३४५६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३९ हजार २९७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १३९० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.आता अधिकची टाळेबंदी परवडणारी नाही हि बाब सरकारच्या लक्षात आल्याने धोकादायक भाग वगळून अन्य ठिकाणी सरकारने आता टाळेबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे उद्योजक,व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील आठवडी बाजार व नेहरू भाजीमार्केट बंद राहील.भाजी विक्रेते यांनी रस्त्यावर भाजीपाला विक्री करू नये.फक्त दैनंदिन भाजीपाला विक्रेते यांनी ठरवून दिलेल्या बाजार ओट्यावर ९ ते ५ वेळेत विक्री करावी. ठरवून दिलेल्या व्यतिरिक्त कोणीही भाजीपाला विक्री करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.खाद्यपदार्थ- हॉटेल,रेस्टॉरंट व चहा टपरी,शितपेय,रसवंती बंद राहतील.परंतु मागणी नुसार घरपोच सेवा (गृहसेवा) देवू शकतील.अटो रिक्षा यांना आपल्या गाडीत चालकासह तीन प्रवाशांना परवानगी राहणार आहे.
या सवलतीत सलून,ब्यूटी पार्लर यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात सॅनिटायझर ठेवावे.ग्राहकांमध्ये किमान ५ फूट अंतर ठेवावे. तसे न केल्यास व एखाद्या दुकानावर गर्दी आढळल्यास दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नागरिकांनी आपापसात बोलतांना १ मीटर अंतर ठेवावे. तोंडावर मुखपट्यांचा नियमित पणे वापर करावा. तसे आढळून न आल्यास रु.५०० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.दुकानमालक,दुकान कर्मचारी,ग्राहक व नागरिक यांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.शाळा, महाविद्यालय,शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था,कोचिंग क्लासेस बंद राहणार आहे.सिनेमा हॅाल्स, शॉपिंग मॉल्स, जिम, जलतरण तलाव,आदींना परवानगी नाही.

सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेश बंद राहील.अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत या कालावधीत निर्बंध राहील.शहरातील सर्व विक्रेते, ग्राहक व नागरिक यांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती आदेशाचे पालन करावे लागेल अन्यथा आपणावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.शहरातील सर्व व्यापारी व नागरिक यांच्या आग्रहास्तव शनिवारी कोपरगाव शहरात जनता जमावबंदी पाळण्यात येणार आहे असे आवाहनही तहसीलदार चंद्रे व मुख्याधिकारी सरोदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close