कोपरगाव तालुका
लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचाच प्रचार करणार-रामदास भोसले
शिवसेना पक्षाचा आदेश पाळणार!
पारनेर(प्रतिनिधी )- लोकसभा निवडणुकीत आम्ही पक्षाचा आदेश स्विकारुन युतीचे उमेदवार सुजय विखेंचेच मी काम करणार असल्याने कालच्या पारनेरच्या मेळाव्याला गैरहजर असलो तरी युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. सुजय विंखेवर मी नाराज असलो तरी ही निवडणुक देशाचे भवितव्य ठरविणारी असल्याने विखेंचाच प्रचार करणार असुन आमची नाराजी योग्य वेळी सांगु आज ती वेळ नाही असा निर्वाळा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी केला आहे.
पारनेर येथे काल झालेल्या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी सभापती गणेश शेळके आदी शिवसेना पदाधिकारी गैरहजर असल्याने पारनेर शिवसेना सुजय विखेंवर नाराज आल्याच्या बातम्या छापुन आल्या यावर भोसले यांनी खुलासा केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विखेंनी माझ्या विरोधात प्रचार सभा घेतल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम केले. तर या निवडणुकीतही आम्ही आमच्या पक्षाचा आदेश मानुन विखेंचे काम करणार आहे. आम्ही नाराज असलो तरी योग्य वेळी नाराजी बोलु. आज ती वेळ नाही.त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचेच काम करणार आहे.