जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नाठाळ ठेकेदारांवर कोपरगाव नगरपरिषदेचा कारवाईचा बडगा!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अनेक ठेकेदारांनी कार्यादेश घेऊनहीं बराच काळ लोटूनही कामाला सुरुवातही केलेली नाही त्यांना नोटीसा बजावूनही प्रतिसाद न दिल्याने या नाठाळ ठेकेदारांची कामे रद्द करून त्यांची पाच लाख रुपयांची अनामत जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या रद्द केलेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना कोपरगाव नगरपरिषदेत यापुढे नव्याने कुठलीही कामे करता येणार नसल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत गत अनेक वर्षांपासून अनेक रस्त्यांची कामे घेऊन त्या कामाकडे पाठ फिरावणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोठी असून या ठेकेदारांच्या नाठाळपणामुळे रस्त्यांची शहरात धूळधाण झाली आहे.या रस्त्यांच्या ठेकेदारीत जुन्या नगरसेवकांच्या जवळचे किंबहुना तेच यात गुंतले असल्याचे आरोप नगरपरिषदेत सत्तांतर झाल्या-झाल्या संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभांत झाले होते.त्यामुळे शहरात कोणीही नवीन नागरिक शहरात आला कि तो पालिकेला या गलथानपणाबद्दल शिव्या हासडल्याशिवाय परत जात नाही हे वास्तव आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत गत अनेक वर्षांपासून अनेक रस्त्यांची कामे घेऊन त्या कामाकडे पाठ फिरावणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोठी असून या ठेकेदारांच्या नाठाळपणामुळे रस्त्यांची शहरात धूळधाण झाली आहे.या रस्त्यांच्या ठेकेदारीत जुन्या नगरसेवकांच्या जवळचे किंबहुना तेच यात गुंतले असल्याचे आरोप नगरपरिषदेत सत्तांतर झाल्या-झाल्या संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभांत झाले होते.त्यामुळे शहरात कोणीही नवीन नागरिक शहरात आला कि तो पालिकेला या गलथानपणाबद्दल शिव्या हासडल्याशिवाय परत जात नाही हे वास्तव आहे.त्यामुळे अनेक दिवसापासून या प्रलंबित कामे ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी असा दबाव कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर होता.मात्र त्यात अनेक तांत्रिक बाबीची गुंतागुंत असल्याने या कारवाईला उशीर होत होता.अखेर पालिका या निर्णयाप्रत आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या प्रलंबित रस्त्याचे काम व ते कोणत्या ठेकेदाराने घेतले आहे ते दर्शवले आहे.इंदिरा शाँपिंग ते तुळजा भवानी मंदिर ते अमरधाम डांबरीकरण (बाबासाहेब शिंदे),भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व ग्रंथालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते क्षिरसागर हॉस्पीटल रस्ता डांबरीकरण काम (विजय वाघ),वैद्य घर ते बोथरा घर कॉन्क्रीटिकरण ( गोपाळकृष्ण मजूर सह.संस्था),वाघ घर ते काले घर कॉन्क्रीटिकरण ( गोपाळकृष्ण मजूर सह.संस्था),डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील गटार क्रॉसिंग काम ( गोपाळकृष्ण मजूर सह.संस्था),डॉ.आचारी हॉस्पिटल ते वाघ घरापर्यंत खडीकरण करून कॉन्क्रीटिकरण करणे (विजय कोटकर)
हेम मेडिकल ते श्री गोकुळचंद विदयालय रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कचेरी रस्ता ( बँक रोड), गुरुद्वारा रोड (साई शांती कॅस्ट्रक्शन) या तिन्ही कामांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून नव्याने या तीनही रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे अंदाज पत्रके तयार केली आहे लवकरच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन सदरील रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे.त्यामुळे नाठाळ ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close