कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात ..या रस्त्याचे कामास सुरुवात
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुंबई व पुणे,नाशिक या महानगरांकडे जाण्यात अहम भूमिका निभावणाऱ्या झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या ७ किमी रस्त्याचे ७.५० कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमीपूजन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. केले.
राज्यात या विषाणूने ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.विकास कामांचा निधी शासनाने अन्यत्र वर्ग केला आहे.त्या मुळे आहे तो निधी वापरणे गरजेचे आहे.अन्यथा तो निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८० ने वाढून ती ७१ हजार ३४८ इतकी झाली असून २३१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २३ हजार ४०१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.विकास कामांचा निधी शासनाने अन्यत्र वर्ग केला आहे.त्या मुळे आहे तो निधी वापरणे गरजेचे आहे.अन्यथा तो निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे विकास कामांना कात्री लागणार आहे.हा मोठा धोका आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.रस्त्यांची तातडीने दुरावस्था हटविणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केले आहे.
त्या वेळी आ. आशुतोष काळे यांनी कोरोनाविरुद्धची ही लढाई सर्वांच्या साथीने आपण नक्कीच जिंकू परंतु मतदारसंघतील विकासकामांमध्ये खंड पडायला नको म्हणून मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतराचे पालन करत साध्या पद्धतीने हे भूमिपूजन करण्यात आले आहे.त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे,काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,आंनद चव्हाण,रोहिदास होन आदी मान्यवर हे उपस्थित होते.