कोपरगाव तालुका
मढी खुर्दच्या सरपंच महिलेला आ.काळेंचा दूरध्वनी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात व देशभरात कोरोना विषाणूमुळे प्रशासन व नागरिकांची धांदल उडलेली असताना कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी तेथील आपल्याशी दुरध्वनिवरून सम्पर्क स्थापित करून ग्रामपंचायत हद्दीतील उपाययोजनांची माहिती घेतल्याची माहिती सरपंच वैशाली आभाळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्यावाढ थांबविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव येवला आदी कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण आढळल्याने मढी परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या स्थितीचा आढावा घेताना मढी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली आभाळे यांना दूरध्वनी केला त्या वेळी हि बातचीत झाली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८ ने वाढून ती ५६ हजार ४०९ इतकी झाली असून १८९० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १७ हजार ९७४ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ६९४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर कोपरगाव तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्यावाढ थांबविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव येवला आदी कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण आढळल्याने मढी परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या स्थितीचा आढावा घेताना मढी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली आभाळे यांना दूरध्वनी केला त्या वेळी हि बातचीत झाली आहे.
त्यावेळी आ.काळे यांनी गावातील परिस्थिती,फवारणी, रेशन वाटप,आदी बाबत चौकशी करताना पुणे,मुंबई किंवा इतर जिल्ह्यामधून आलेले नागरिक संख्या क्वारंटाईन संख्या,क्वारंटाईनचा कालावधी,गावात सॅनिटायझर वाटले का ? लोक सुरक्षित अंतराचा नियम पाळत आहेत का ? गरीब कुटुंबातील कोणी उपाशी तर नाही ना ? ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आशा,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याही आरोग्याची काळजी घेताय का ? आरोग्य विभागामार्फत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे झाला का ? गावच्या प्रथम नागरिक म्हणून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ न देण्याचे आवाहन केले आहे.मढी हे गाव सिन्नर तालुक्यातील कोरोना रुग्ण सापडलेल्या पाथरे गावाशेजारी असल्यामुळे जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.व अडचण असेल तर संपर्क साधण्यास आ. काळे यांनी शेवटी सांगितले असल्याची माहिती सरपंच वैशाली आभाळे यांनी शेवटी दिली आहे.