कोपरगाव तालुका
आर्थिक दुर्बक घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवा-आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना बाधितांची संख्या देशात सर्वाधिक असल्याने अनेक दुर्बल घटकांचे रोजगार हिरावले गेले आहे.त्यामुळे अनेकजण अडचणीत आला आहे.या कठीण समयी लायन्स क्लब सारख्या संघटनानीं उभे येऊन नागरिकांना सहकार्य करणे हि ईश्वर सेवाच असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी नुकतेच एका कंर्यक्रमात बोलताना केले आहे.
दरम्यान या वस्तूत ५ किलो आटा, तीन किलो तांदूळ,एक किलो गोडेतेल,शंभर ग्रॅम चहा पावडर,पाचशे ग्रॅम तूरडाळ,हरभरा डाळ,शंभर ग्रॅम मिरची पावडर,जिरे,साबण,मास्क, मोहरी,चटपट मसाला आदींचा समावेश आहे.यावेळी सुरक्षित अंतराचे पालन करून हा सामाजिक उप्पक्रम साजरा करण्यात आला आहे.
कोपरगाव लायन्स कलुब,लायनेस क्लब,लिओ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे एक हजार आर्थिक दुर्बक घटकाना साधारण एक महिना पुरेल इतका धान्यसाठा,किराणा तत्सम वस्तूंचे वाटप प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे,राजेश ठोळे,संदीप कोयटे,तुलसीदास खुबाणी,सिद्धांत बागरेचा, कांतीलाल वक्ते,नरेंद्र कुर्लेकर,प्रा.शैलेंद्र बनसोडे,स्वनिल भंडारी,सुधीर डागा,पंकज ठोळे,किरण शिरोडे,किरण डागा,आदिसंह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.