जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ..यांची तालुका आढावा बैठक संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी
कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक,मुख्याधिकारी व पंचायत समितीमध्ये सभापती,उपसभापती,जिल्हा परिषद सदस्य गटविकास अधिकारी यांच्या समवेत सुरक्षित अंतर पाळून स्वंतंत्र बैठका घेतल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावातील सर्व सरपंचांनी शेजारील तालुक्यातील नागरिक आपल्या गावात येणार नाही व आपल्या गावातील नागरिक शेजारच्या तालुक्यात जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्या-आ. काळे

या बैठकांसाठी कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,भाजपचे गटनेते रवींद्र पाठक,कोपरगाव पंचायत समितीच्या समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कारखान्याचे माजी संचालक कारभारी आगवन,सुधाकर दंडवते,सोनाली रोहमारे,सोनालीताई साबळे,पंचायत समिती सदस्य अनुसया होन,मधुकर टेके,श्रावण आसने, बाळासाहेब रहाणे,पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख,तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गावांचे सरपंच आदी मान्यवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.

कोपरगाव शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी सुरु आहे मात्र अनेक नागरिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सत्य माहिती सांगत नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्यासाठी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना आरोग्याविषयी वास्तव परिस्थिती सांगण्यासाठी सूचना करून प्रत्येक नागरिकाची तपासणी करून घ्यावी.शहरातील सर्व कुटुंबांसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १७ हजार सॅनिटायझर उपलब्ध करून दिले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत सॅनिटायझर पोहोचेल याची काळजी घ्यावी.कोपरगाव शहरातील विविध जीवनावश्यक साहित्याच्या दुकानांची वेळ ठरवावी.शासनाकडून रेशनवर आलेले धान्य सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का नाही याची शहरात असलेल्या सर्व रेशन दुकानात जाऊन खात्री करावी.कोपरगाव शहरात शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली असून आपापल्या प्रभागातील नागरिकांना याची माहिती द्यावी.सर्व प्रभागात स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत असून नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छता ठेवण्यासाठी आवाहन करावे असे आवाहन त्यांनी केले.

कोपरगाव पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत सभापती,उपसभापती,जिल्हा परिषद सदस्य यांना मार्गदर्शन करतांना आ.आशुतोष काळे यांनी १४ व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा संरक्षण देणेबाबत झालेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याची खात्री करावी.१४ व्या वित्त आयोगातुन दिव्यांग व्यक्ती व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना मदत देण्याबाबत झालेल्या सूचनांची खातरजमा करावी.सर्व गावातील तलाठी,मंडल अधिकारी,कोतवाल,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या उजव्या व डाव्या कालव्याचे आवर्तन सुरु असून आपापल्या गावातील पाणीपुरवठा योजनांचे तलाव काळजीपूर्वक भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close