कोपरगाव तालुका
कोपरगावात ..यांची तालुका आढावा बैठक संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक,मुख्याधिकारी व पंचायत समितीमध्ये सभापती,उपसभापती,जिल्हा परिषद सदस्य गटविकास अधिकारी यांच्या समवेत सुरक्षित अंतर पाळून स्वंतंत्र बैठका घेतल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावातील सर्व सरपंचांनी शेजारील तालुक्यातील नागरिक आपल्या गावात येणार नाही व आपल्या गावातील नागरिक शेजारच्या तालुक्यात जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्या-आ. काळे
या बैठकांसाठी कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,भाजपचे गटनेते रवींद्र पाठक,कोपरगाव पंचायत समितीच्या समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कारखान्याचे माजी संचालक कारभारी आगवन,सुधाकर दंडवते,सोनाली रोहमारे,सोनालीताई साबळे,पंचायत समिती सदस्य अनुसया होन,मधुकर टेके,श्रावण आसने, बाळासाहेब रहाणे,पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख,तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गावांचे सरपंच आदी मान्यवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
कोपरगाव शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी सुरु आहे मात्र अनेक नागरिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सत्य माहिती सांगत नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्यासाठी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना आरोग्याविषयी वास्तव परिस्थिती सांगण्यासाठी सूचना करून प्रत्येक नागरिकाची तपासणी करून घ्यावी.शहरातील सर्व कुटुंबांसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १७ हजार सॅनिटायझर उपलब्ध करून दिले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत सॅनिटायझर पोहोचेल याची काळजी घ्यावी.कोपरगाव शहरातील विविध जीवनावश्यक साहित्याच्या दुकानांची वेळ ठरवावी.शासनाकडून रेशनवर आलेले धान्य सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का नाही याची शहरात असलेल्या सर्व रेशन दुकानात जाऊन खात्री करावी.कोपरगाव शहरात शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली असून आपापल्या प्रभागातील नागरिकांना याची माहिती द्यावी.सर्व प्रभागात स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत असून नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छता ठेवण्यासाठी आवाहन करावे असे आवाहन त्यांनी केले.