जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या माजी नगराध्यक्षांचे अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या धर्मपत्नी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे आणि समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेत उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुहासिनी कोयटे यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारी नाटिका सादर केली.नाटिकेद्वारा त्यांच्या जीवनातील चढ-उतार दाखविण्यात आला आहे.

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका डॉ.अंजली पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे,लताताई चौधरी,मंगला लोणगावकर,सुमंगल साखरे,सांगली येथील महादेव माळी,मंगल माळी,कल्याणीताई हुरणे,समता पतसंस्थेचे उपाध्यक्षा श्वेता अजमेरे,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,ज्योत्स्ना पटेल,मीना व्यास,सुनंदा भट्टड,किरण डागा,आशालता विभूते,विमल कर्डक,वैशाली जाधव,माजी नगरसेविका दिपा गिरमे,रजनी भुसारे,छाया सोनेकर,कोयटे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा मोकळ,शिक्षिका तृप्ती कासार,मनिषा कांबळे,स्वप्नाली महिरे,जागृती ठाकूर,छाया ओस्तवाल, नाजमिन अत्तार,सोनाली पवार,त्रिवेणी पवार आदींसह निवारा भजनी मंडळ,कोपरगाव तालुका महिला लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी,समता परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर प्रसंगी सुहासिनी कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय परिसरात ३६६ वृक्षांचे वृक्षारोपण उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी समता स्कूल मधील विद्यार्थी घेणार असल्याचा संकल्प देखील समताच्या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने केला असून हा उपक्रम पर्यावरणाचा बिघडलेला असमतोल नियंत्रणात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता परिवाराचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close