कोपरगाव तालुका
कोपरगावनजीक जुगार खेळताना चौदा जणांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत मनाई वस्ती कचरा डेपोच्या बाभळीखाली काटवनाचा आडोसा घेऊन तिरट नावाचा जुगार खेळताना चौदा जण आढळून आले असून त्यांच्याकडून ३३ हजार ८९० रुपये रोख रक्कम जप्त येऊन त्यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात अवैध जुगार खेळणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व कोपरगाव सहकारी औदयोगिक वसाहतीच्या नजीक दक्षिण बाजूस मनाई वस्तीच्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर काटवन तयार झाले आहे.अवैध व्यवसायासाठी हि जागा नंदनवनच ठरले आहे.याची खबर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आपल्या खबऱ्या मार्फत लागली असता त्यांनी आपले पथक घेऊन काल दुपारी साडे चारच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली असता हि धक्कादायक घटना उघड झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यात व देशात सध्या कोरोना विषाणूने कहर उडवून दिला आहे.पोलीस प्रशासनाचे त्याकडे लक्ष केंद्रित झाले असून अन्य अवैध व्यावसायिक चेकाळले आहे.त्यातूनच अवैध व्यवसायांना सध्या मोठ्या प्रमाणावर बरकत आली आहे.त्यात अवैध जुगार,गुटखा,अवैध दारू,तंबाखू सिगारेट,यांचा सूळसुळाट झाल्याचे वर्तमान चित्र तयार होऊ लागले आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व कोपरगाव सहकारी औदयोगिक वसाहतीच्या नजीक दक्षिण बाजूस मनाई वस्तीच्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर काटवन तयार झाले आहे.अवैध व्यवसायासाठी हि जागा नंदनवनच ठरले आहे.याची खबर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आपल्या खबऱ्या मार्फत लागली असता त्यांनी आपले पथक घेऊन काल दुपारी साडे चारच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळताना पुढील आरोपी आढळून आला आहे.
पुढे आरोपी त्याचे नाव,वय,गावाचे नाव दर्शवले आहे. रुपेश बुध्दिनारायण पुरोहित (वय-२२) योगेश बाळासाहेब जाधव, ( वय-३२) छोटू यासिक पठाण (वय-३२),तिघे रा.गांधीनगर,कोपरंगाव,चेतन परशुराम धुमने,( वय-२२) संजयनगर,इब्राहिम रमजाण शेख,(वय-५०),नितीन बाळकृष्ण वाघमारे,(वय-४२)रा.लक्ष्मीनगर,सिकंदर अरमान शेख ( वय-५८) इंदिरानगर,नयीन सलीम सय्यद,(वय-३०),रा.कोल्हार,बबन मारुती मंजुळ (वय-६५) गांधीनगर,डेव्हिड दत्तू गायकवाड (वय-५२)रा.सावळीविहिर,कलिम भिकन बागवान,(वय-४२) इंदिरानगर कोपरगाव,कैलास नारायण लुटे,(वय-५०) रा.कोल्हार,रामदास भिकाजी केकाण ( वय-५५) रा.जेऊर कुंभारी ता.कोपरगाव,रामदास गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही) रा.मनाई वस्ती संवत्सर ता.कोपरगाव.आदी चौदा जणां विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४६/२०२० भा.द.वि,कलम १८८(२),२६९,२७१ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळावरून त्यांच्याकडून रोख रक्कम ३३ हजार ८९० रुपये जप्त करण्यात आले आहे.हे सर्व जण आपल्या तोंडाला मास्क न लावता संचारबंदीचे उल्लंघन करत सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्याचे काम करत होते.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हे.कॉ.अशोक गवसने हे करीत आहेत.