कोपरगाव तालुका
..या सरपंचांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजारांची मदत
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोरोना साथीने राज्यात थैमान घातले असताना त्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना सामाजिक राजकीय क्षेत्रातही नागरिकही चांगलेच सरसावले असून कोपरगाव तालुकायतील सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश नुकताच स्टेट बँकेत जमा केल्याचे पत्र त्यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सोपवले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना साथीने राज्यात थैमान घातले असताना त्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना सामाजिक राजकीय क्षेत्रातही नागरिकही चांगलेच सरसावले असून कोपरगाव तालुकायतील सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश नुकताच स्टेट बँकेत जमा केल्याचे पत्र त्यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सोपवले आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभावावर शासन त्यावर प्रभावी उपाययोजना करीत आहे. तसेच शासना सोबत अनेक समाजसेवी संघटना तसेच अनेक संस्था आपले योगदान देत असुन तालुक्यातील नागरीक हि त्या कामी मागे नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधिस मदत करण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत भानुदास वाबळे यांनी शासनाकडुन ग्रामपंचायत सरपंच यांना मानधनापोटी मिळणाऱ्या रकमेतुन जमा झालेली मागील १२ महीन्यातील रक्कम तसेच त्यांना मिळणाऱ्या स्वतःच्या सैनिक सेवा निवृत्ती वेतनातुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रूपयांची मदत दिली आहे. हि रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया च्या खात्यात धनादेशद्वारे जमा केल्याची माहीती त्यांनी एका पत्रकाद्वारे तहसिलदार योगेश चंद्रे यांना दिली आहे .
सरपंच शाशिकांत वाबळे हे कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रगतशिल शेतकरी असुन राहाता कृषी उत्पंन बाजार समिती येथे त्यांचा कांदा तसेच डाळींबाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर ते सेवा निवृत माजी सैनिक असुन राजकारणा बरोबर ते समाजकारणातही अग्रेसर आहेत
सरपंच शशिकांत वाबळे यांनी कोरोनाग्रस्तांना केलेल्या मदती बद्दल महा ई सेवा केंद्र कुंभारी चे संचालक सतिश कदम सुरेगाव पंचक्रोशीसह तालुक्यात त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे .