कोपरगाव तालुका
मास्क नाही,कोपरगावात सोळा जणांवर कारवाई !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने मास्क लावण्यास कायदेशीर तरतूद केलेली असतानाही अद्याप काही बेताल नागरिक या विषाणूला रोखण्यास आवश्यक उपाय योजना करताना दिसत नसल्याने कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरात विविध मोक्याच्या दोन ठिकाणी पथके नेमून आज तिसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत सोळा व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा असा एकूण ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्क न लावणाऱ्या व कुठेही थुंकणाऱ्या नाठाळ नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी दोन दिवसा पासून दंड करण्यास प्रारंभ केला आहे.त्यात रस्त्यावर थुकणाऱ्यांना दंड आकाराला जाणार आहे.पहिल्या दिवशी तेरा जणावर कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी पंधरा जणांवर तर आज तिसऱ्या दिवशी सोळा जणांवर हि कारवाई करण्यात आली आहे
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४२७ ने वाढून ती १८ हजार ९७० इतकी झाली असून ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार ६६६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत असले तरी प्रतिबंदात्मक उपाय योजना करण्यास काही नाठाळ व बेजबाबदार नागरिक तयार असल्याचे दिसत नाही.
नगर जिल्ह्यत चार व उत्तर नगर जिल्ह्यात तीन तर कोपरगाव तालुक्यात दोन नागरिकांचा या विषाणूने बळी गेला असतानाही हि बेजबाबदार वृत्ती घातक असल्याची हि बाब सरकारच्या लक्षात आल्याने सरकारने हा विषाणू रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.त्या अंतर्गत जे नागरिक पहिल्यांदा मास्क लावणार नाही त्यांना प्रथम ५०० रुपयांचा तर दुसऱ्या गुन्ह्यात हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.मात्र तरीही काही नागरिक अद्यापही आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे अभद्र प्रदर्शन करत आहे.त्यामुळे अखेर कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा नाठाळ नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी दोन दिवसा पासून दंड करण्यास प्रारंभ केला आहे.त्यात रस्त्यावर थुकणाऱ्यांना दंड आकाराला जाणार आहे.पहिल्या दिवशी तेरा जणावर कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी पंधरा जणांवर तर आज तिसऱ्या दिवशी सोळा जणांवर हि कारवाई करण्यात आली आहे.हि मोहीम पुढे सुरु ठेवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.त्यामुळे या बेशिस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.