कोपरगाव तालुका
डॉ.आंबेडकर जयंती निमित्त या नेत्याने केले अभिवादन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देश व राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सार्वजनिक जयंती साजरे करण्यावर निर्बन्ध घालण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.
डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
यावेळी बोलतांना आ.काळे म्हणाले की,कोरोना सारख्या जागतिक महासंकटाच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे.हे प्रयत्न यशस्वी देखील होत आहे. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्व नागरिकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करणे हीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरीखुुरी आदरांजली राहणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यात येणार नाही त्यामुळे बुद्धिस्ट फाउंडेशन व समता सैनिक दल, सुरेगाव यांच्या वतीने परिसरातील गरजू विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात येणार आहेत. याचा प्रारंभ आ.काळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एका महिलेला जीवनावश्यक वस्तू देऊन करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी बुद्धिस्ट फाउंडेशन व समता सैनिक दल यांचे कौतुक केले.यावेळी सामाजिक अंतराचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब उपस्थित होते.