कोपरगाव तालुका
..यांनी केले आरोग्य सेवकांना पीपीई किटचे वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याच्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात तातडीची बैठक घेऊन आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण ती मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.
या वेळी बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा कसून शोध घेऊन या सर्व व्यक्तींच्या तातडीने तपासण्या कराव्या. बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी देखील घाबरून न जाता स्वतः हुन पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे-आ.काळे
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. कृष्णा फुलसुन्दर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे,शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक मंदार पहाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.
या वेळी बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा कसून शोध घेऊन या सर्व व्यक्तींच्या तातडीने तपासण्या कराव्या. बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी देखील घाबरून न जाता स्वतः हुन पुढे यावे असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे. कोपरगावचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्राणाची बाजी लावली आहे त्यामुळे नागरीकांबरोबरच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखीलआपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्व नागरिकांनी आपापल्या घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.त्यासाठी घाबरून न जाता संयम ठेवावा.कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.शनिवार पासून पुढे चार दिवस संपूर्ण कोपरगाव तालुका टाळेबंदी करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालये व औषधालये वगळता सर्व जीवनावश्यक सेवा सुद्धा बंद राहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन आ.काळे यांनी केले असून जे नागरिक अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडतील अशा नागरिकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.