जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आता सक्तीची टाळेबंदी,बारा संशयीत हलवले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे झाले असून त्यांनी रात्रीच लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर व नजीकचा परिसर सील केला असून या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे बारा जण रात्रीच ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी नगर येथे करण्यात आली आहे.त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली आहे.दरम्यान पालिकेने रात्रीच जंतुनाशक फवारणीस प्रारंभ केला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान या घटनेत सतरा जण संपर्कात आल्याची ताजी माहिती वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून सुरक्षिततेसाठी कोपरगाव तालुका १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. जिवनावश्यक वस्तूंची दुकानही बंद असणार आहेत. या दरम्यान नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
सदर कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतः पुढे येऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी व स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवावे-आ.आशुतोष काळे

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७ हजार ६७७ इतकी झाली असून २४९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर वाढ होऊन ती संख्या १ हजार ५७६ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्हयात एकाचे निधन तर २७ जणांना बाधा झाली असून त्यात कोपरगावातील महिलेचा समावेश आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.

सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र काही बेजबाबदार नागरिकांकडून पालन होत नाही.हि खेदाची बाब आहे-अध्यक्ष कोपरगाव नगर परिषद.

पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.काल लक्ष्मीनगर या उपनगरात एक ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे खडबडून जागे झालेल्या तालुका व शहर प्रशासनाने रात्रीच हा भाग सील केला असून नजीकचे उपनगरे सील केली असून त्यांतील सर्व कुटुंबांची तपासणी सुरु केली आहे.या खेरीज या भागातील प्रत्येक गल्लीत सोडिअम हायपोक्लाराईडची फवारणी सुरु केली आहे.

कोपरगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील एक ६० वर्षीय महिला करोना संसर्ग बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्याने.संपूर्ण कोपरगाव शहर दिनांक १४ एप्रिल पर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा सह बंद करण्यात येत आहे.संपूर्ण संचार बंदी लागू केली आहे.तसेच लक्ष्मीनगर परिसर पूर्ण पणे सील करण्यात आला आहे.घाबरून जावु नका.आता इथून पुढे अधिक काळजी घ्या.अंतर ठेवून बोला.हात अजिबात तोंडाला लावू नका.हात वारंवार स्वच्छ धुवत राहा. नियमितपणे मास्क चा वापरा करा-प्रशांत सरोदे,मुख्यधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

ताब्यात घेतलेल्या नागरिकांचा अहवाल पुण्याहून उद्या येणे अपेक्षित आहे.तो पर्यंत सलग चार दिवस १४ एप्रिल अखेर शहरात रुग्णालये व संलग्न औषधालयें वगळता संपूर्ण शहराला टाळेबंदी ठोकली आहे.आता किराणा,भाजीपाला,दूध,फळे,आदी सर्व दुकाने बंद ठेवली आहे.नागरिकांनी आपल्या कोणत्याही कामासाठी आता घराबाहेर पडू नये अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे.

आपल्या शहरात एक रुग्ण कोरोना पीडित रुग्ण आढळला आहे तरी कोणीही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.कोणीही घराबाहेर निघू नका.२४ तास तोंडाला मास्क लावा,सॅनिटायजरचा वापर करा, सर्दी खोकला किंवा न्यूमोनियाची लक्षण आढळून आल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात जा.कोणताही आजार अंगावर काढू नका. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे.-राकेश मानगावकर, पोलीस निरीक्षक कोपरगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close