जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

१४ एप्रिल पर्यंत कर्जमुक्ती झाली नाही तर साखर,दूध,भाजीपाला बंद – रघुनाथ दादा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यातील शेतकऱ्यांना घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल या जयंतीपूर्वी कर्जमुक्ती केली नाही तर साखर कारखानदारांची बाहेर निर्यात केली जाणारी साखर आणि शहराकडे जाणारा दूध,भाजीपाला बंद केला जाईल जाईल सोबत सरकारविरुद्ध प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून कलम ४२० चा गुन्हा दाखल केला जाईल असा अंतिम इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी आज पुणे येथील आंदोलनात दिला आहे.

आयुक्त कार्यालयात घेराव घातल्यावर मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे दिसत आहेत.

दरम्यान पुणे येथील महसूल आयुक्त र.शा.नाईकवाडी,साखर सह संचालक अविनाश देशमुख यांचेशी भेट घेऊन चर्चा केली आहे.त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा,प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,क्रांतिसिंह नाना पाटील बिग्रेडचे प्रांताध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे आदींचे समाधान झाले नसल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जावा,दुधास चाळीस रुपयांचा दर तर दुधाचे थकित अनुदान देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या शेतीमालास एम.एस.पी.प्रमाणे दर द्यावे,आदी मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व राज्यातील पहिली आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव कर्पे यांच्या स्मृति दिनानिमित्त शेतकरी संघटनेने पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा निर्णय जाहीर केला होता ते आंदोलन आज दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

“राज्य सरकारने आगामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपन्न होत असून तो पर्यंत कर्जमाफी केली नाही.तर प्रत्येक ठिकाणी सरकार विरुद्ध तालुका न्यायालयात गुन्हे दाखल केले जातील”-ॲड.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

सदर प्रसंगी राष्ट्रीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसबिरसिंग भाटी,हरियाणाचे शेतकरी नेते देवसिंह आर्य,कर्नाटकचे माजी मंत्री नाईक,प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, डॉ.सौ.चव्हाण,शेतकरी संघटनेचे संघटक रुपेंद्र काले,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे,शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,सुरेश ताके,जिल्हा संघटक शिवाजी जवरे,ॲड.श्री.कावळे,आम आदमी पार्टीचे मुकुंद किरदर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार),राष्ट्रीय काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी,(आप),संभाजी बिग्रेड नगर जिल्हाआदींनी शेतकरी संघटनेस आपला पाठिंबा दिला आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,
पुणे आयुक्तांच्या भेटीच्या वेळी साखर सह संचालक अविनाश देशमुख यांनी रघुनाथ दादा पाटील यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात गुजरात सारखे उसाला ०४ हजार ५०० रुपयांचा दर देता येणार नाही,आपल्याकडे तशी व्यवस्था नाही या उत्तराचा चांगलाच समाचार घेतला आहे.त्यावेळी त्यांनी आमचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऊस साखर उतारा देत नाही का ? असा तिखट सवाल करून अशा निर्लज्ज निर्लज्ज अधिकाऱ्यांना बुटाने मारले पाहिजे असे सुनावले व या अधिकाऱ्यांचे मागे सरकारमधील पुढारी असल्याचा आरोप केला आहे.वर्तमानात शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न का होत नाही याचे उत्तर आतबट्ट्याचा शेती व्यवसायात दडले आहे असे सांगून आपण सन -१९७४ चा पदवीधर आहे.त्यावेळी मी बंगलोर येथून गायी आणून दूध धंदा सुरू केला होता.त्यावेळी दुधाला दर १.५० रुपया होता तर,डिझल ४० पैसे होते.आता दूध २४ रुपये तर डिझल ९२ रुपये आहे.म्हणजे दूध धंदा तोट्यात गेला आहे.याला कारण सरकार आहे.त्यामुळे सरकारने संपूर्ण वीज बिले संपूर्ण माफ केली पाहिजे.शेती तोट्यात गेल्याने आता मुलाचे लग्न होत नाही याचा तरी शेतकऱ्यांना राग येणार आहे की नाही असा तिखट सवाल केला आहे.या व्यवस्थेविरुद्ध पेटून उठून आता साखर निर्यात बंद करावी लागेल असा इशारा देऊन राज्यातील कारखानदारांची बाहेर जाणारी साखर बंद करणार आहे.आत्महत्या थांबवायची असेल तर शहराकडे जाणारे दूध,भाजीपाला आणि साखर बंद केली जाईल हा इशारा अंतिम आहे.
साखर वाहतुकीसाठी ट्रॅक मालक चालकांनी आता येथून पुढे आपली वाहने देऊ नये असे आधी जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वांना सावध केले आहे.उद्या आम्हाला नाव ठेऊ नये.दरम्यान त्यांनी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना न मागता देण्यात येणारे वेतन आयोग याचा खरपूस समाचार घेताना लेखक व शिक्षक हेरंब कुलकर्णी यांचे उदाहरण देऊन त्यांनी आपला सातवा वेतन आयोग नाकारला होता.मी पगारइतके काम करत नाही अशी प्रामाणिक भूमिका घेतली मग इतर कर्मचारी आणि अधिकारी का घेऊ शकत नाही.त्यामुळे आगामी काळात ०८ वा वेतन आयोग घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे आम्ही पाहणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.यावेळी देशभरात लाखो कोटी रुपये रस्त्यावर खर्च करणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी एका रस्त्याचे पैसे दिले तरी शेतकरी कर्जमाफी होईल असे आवाहन केले आहे.विद्यमान भाजप सरकारने दोन साखर कारखान्याच्या अंतराची अट रद्द केली पाहिजे अशी मागणी करून जो पर्यंत शेतकरी सुजलाम सुफलाम होणार नाही तो पर्यंत शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा शेवटी दिला आहे.
त्यावेळी ते म्हणाले की,”पुणे जिल्ह्याने संत द्यानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,शेतकरी संघटनेचे स्व.शरद जोशी यांना मोठे केले आहे.ॲड.अजित काळे यांनी जे सरकारला न्यायालयात खेचण्याचे जे आंदोलन जाहीर केले त्याला आमचा पाठिंबा आहे.आपण पूर्वी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले होते.शेतकरी संघटनेचे बळ कमी करण्यासाठी सरकारने कार्यकर्त्यांत फूट पाडण्याचे खूप प्रयत्न केले ते उगीच नाही.साखर कारखानदार राजकारणातील काळा पैसा याच कामासाठी वापरला जातो असा आरोप केला..त्यासाठी प्रभाकर पणशीकरांच्या नाटकाचा मराठी माणूस लढून हरवता येत नाही त्यांच्यात फूट पाडून त्याला संपवता येते” हा उतारा उर्ध्वुत करून शेतकरी संघटनेचा फुटीचा शाप खोटा ठरवावा लागेल असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी जसबीरसिंग भाटी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की,” शेतकऱ्यांनी आता आपल्या आत्महत्या थांबवल्या पाहिजे आणि प्रस्थातांविरोधात लढण्याचे शिकले पाहिजे.आपल्या मुलांच्या  आणि आपल्या भविष्यासाठी लढले पाहिजे.आमच्या मेहनतीचे योग्य मोबदला दिला नाही म्हणून आम्ही कर्जात बुडालो.आम्हाला कर्जमाफी दिली जात नाही या उलट मागता ती  ती उद्योजकांना दिली जाते.देशातील शेतकऱ्याचे कर्ज केवळ १६.५० लाख कोटी रुपये आहे.मात्र त्याची काळजी सरकार करत नाही.आम्ही शंभू बोर्डरवर आजही आंदोलन करत आहे.आम्ही दिल्लीतील आंदोलनात आम्ही १८ लाख लोक शेतकरी हजर होतो.आपले सहकार्य मिळाले आणि दिल्लीत घेराव घातला तर सरकार ठिकाणावर येईल.व्यापाऱ्यावर जी.एस.टी.घेत नाही आणि शेतकऱ्यावर मात्र लादली जाते.आम्ही जगाचे पोशिंदे आहोत पण आम्हाला कर्ज माफी देत नाही हे विशेष आहे.सोयाबीन आणि कापसाचा भाव आज १५ वर्षांनी तोच आहे.

  सदर प्रसंगी शेतकरी नेते सेवासिंह आर्य बोलताना म्हणाले की,सत्तेत आलेल्या सरकारांनी शेतमालाला योग्य भाव मिळाले नाही म्हणून शेतकरी कर्जात बुडालो आहे.त्यामुळे आगामी काळात आत्महत्या करण्याऐवजी संघर्ष करा असे आवाहन केले आहे.दिल्लीतील आंदोलनाला आपल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

   सदर प्रसंगी कर्नाटकचे माजी मंत्री श्री नाईक यांनी शेतकऱ्यांनी संघटित राहिले पाहिजे तरच न्याय मिळेल असे आवाहन केले आहे.आमच्या आई वडिलांनी शेती केली आणि फुकटखाऊ लोकांना शेती करण्यासाठी जन्म दिला आहे का असा तिखट सवाल केला आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे बोलताना म्हणाले की,”शेतकरी संघटनेने राज्यात जागृती केली त्यामुळे आता सत्ताधारी कर्जमाफीबद्दल बोलायला लागले आहे.विधानसभेत बोलणारी मंडळी विधानसभा बंद करून दाखवावी केवळ शेतकरी संघटनेस श्रेय जायला नको म्हणून पोपटपंची सुरू केली आहे.न मागता नोकरदारांना ०८ व्या वेतनआयोगाची तयारी सुरू केली आहे.शेतकऱ्यांचे सरकारने कृषी दर कमी देऊन आर्थिक शोषण केले आहे.त्यामुळे आम्हाला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती केली पाहिजे अशी मागणी केली आहे.कृषी मूल्य आयोगाचे दर मागितले आहे.सोयाबीन उत्पादनात ४५०० तोटा घेऊन उत्पादन करतो तो नफ्यात कधीच येऊ शकत नाही.म्हणून शेतकरी संघटनेने संपूर्ण कर्जमुक्ती करून मागितली आहे.शेतकऱ्यांना आता जागृत होण्याची वेळ आली आहे.आता संघटित व्हा त्याच वेळी सरकार जागृत होईल.आगामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपन्न होत असून तो पर्यंत कर्जमाफी झाली नाही.तर प्रत्येक ठिकाणी सरकार विरुद्ध तालुका न्यायालयात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला आहे.शेतकऱ्यांना आपल्या मुलांना कपडे घेता येत नाही बूट घेता येत नाही.ही शोकांतिका थांबवायची असेल तर सरकार विरुद्ध पेटून उठावे लागेल असे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नंदखिले बोलताना म्हणाले की,”माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी दुधाचा उत्पादन खर्च काढला होता.६२.२८ रूपे आहे.त्यावर १५%नफा धरला तर ७५ रुपये दुधाचा भाव ठरतो.त्यावर ५ रुपये अनुदान सरकारने जाहीर केले आहे.त्यामुळे प्रति लिटर दुधाचा भाव मिळाला पाहिजे.म्हशीचा दुधाचा उत्पादन खर्च ९५.३५ आहे त्यावर ,१५% नफा इतका दर द्यायला हवे.पण मिळते का याचे उत्तर नाही असे आहे.त्यामुळे या आतबट्ट्याचा शेती व्यवसायाने शेतकरी नडला आहे.त्याच्या मुलास कोणी पोरी द्यायला तयार नाही.देशाचे पुढारी म्हणतात आधुनिक शेती करा.कशी करायची आहे.शेती मालाचा आयात निर्यात शेतीच्या जीवावर उठवत आहे.त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.एस.एम.पी.कायद्यात ऊसाचा दर दिला नाही तर कारखानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद होती.ती शरद पवार यांनी रद्द केली आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांना चार चार वर्षे ऊसाचा दर मिळत नाही असा आरोप केला आहे.

   यावेळी यू.पी.चे राष्ट्रीय किसान मंचचे उपाध्यक्ष हृदय वर्मा,सुरेश ताके,कर्नाटकचे माजी मंत्री श्री नाईक,प्रकाश शेटे,ॲड.कावळे,खरे मॅडम,दादासाहेब नाब्दे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

सदर प्रसंगी प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले तर उपस्थिताना राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,सुरेश ताके, ॲड.कावळे,खरे मॅडम,प्रकाश शेटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर उपस्थितांचे आभार निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close