गुन्हे विषयक
वार्ताहरांकडून वाळू चोरीचा हप्ता मागत हल्ला! गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात महसुली विभागातील धारणगाव येथील तलाठी धनजंय पऱ्हाड व त्याचा सहकारी सागर उर्फ बबलू चौधरी यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असताना व त्या बातम्यांची शाई वाळलेले नसताना कोळपेवाडी येथे फिर्यादी परवाना धारक वाळू वाहतूक चालकाकडून ०५ हजार रुपयांचा मासिक हप्ता वसूल करताना व चाकू तोंडावर छातीवर वार करून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी तोतया वार्ताहर रमेश भाऊराव भोंगळ व त्याचा सहकारी राधाकृष्ण अण्णासाहेब कोळपे या दोघांवर सुरेगाव येथील फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र मेहरखांब (वय-२५) कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात वर्तमानात वाळूचोरी ही गंभीर समस्या बनली आहे.त्यांचे हप्ते थेट मुंबई पर्यंत वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यापर्यंत जातात म्हणून वाळूचोर आता चेकाळले आहे.आता वार्ताहर यांनी का मागे का राहावे ?असा प्रश्न बहुधा वार्ताहरांना पडला असावा त्यामुळे रमेश भाऊराव भोंगळ याने यात पुढाकार घेतला असावा असे दिसून येत आहे.
राज्यात बेकायदा गौण खनिज उपसा करणे कायद्याने गुन्हा असताना कोपरगाव तालुक्यात प्रचंड अवैध वाळू उपसा होताना दिसत आहे.त्यात महसूल विभाग आणि पोलिस अधिकारी यांचा मोठा सहभाग आढळून येत आहे.परिणामी त्याची किंमत प्रचंड वाढून बांधकाम व्यावसायिकांना आणि नवीन घरे बांधणाऱ्या नागरिकांना चुकवावी लागत असते.महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये अवैधपणे खोदकाम व वाहतूक करण्यात येणा-या गौण खनिज च्या बाजार भावाच्या तिपटी एवढा दंड करता येतो.खनिजाच्या बाजार भावामध्ये ट्रकमधुन वाहतूक करण्याकरिता जो खर्च करता येतो त्याचा अंतर्भाव करावा लागतो.दरम्यान नवीन महसूल मंत्र्यांनी अद्याप नवीन वाळू धोरण अद्याप जाहीर झाले नसताना अशा घटना कोपरगाव तालुक्यात वारंवार उघड होऊनही त्याचा प्रतिबंध होताना दिसत नाही.उलट हप्ते वाढून त्यात आणखी भ्रष्टाचार होताना आढळून येत आहे.कोपरगाव तालुक्यात वर्तमानात वाळूचोरी ही गंभीर समस्या बनली आहे.त्यांचे हप्ते थेट मुंबई पर्यंत वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यापर्यंत जातात म्हणून वाळूचोर आता चेकाळले आहे.आता वार्ताहर यांनी का मागे का राहावे ?असा प्रश्न बहुधा वार्ताहरांना पडला असावा.त्यामुळे आता त्यांनीही या व्यवसायात का मागे राहावे असा प्रश्न न पडला तर नवल! अशीच अधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांकडून हप्ता वसुलीची घटना दि.१७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता उघड झाली आहे.यातील स्वतःला वार्ताहर म्हणून मिरवणारा (!) इसम रमेश भाऊराव भोंगळ याने व त्याचा सहकारी राधाकृष्ण कोळपे या दोघांनी फिर्यादी इसम ऋषिकेश राजेंद्र मेहेरखांब (वय-२५) रा.सुरेगाव यांचा अधिकृत वाळू परवाना असताना त्यांचेकडून त्यांची डंपर गाडी (क्रं.एम.एच.१४डी.एम.४०९०) अडवून वाळू वाहतूक करायची असेल तर आम्हाला दरमहा ०५ हजार रुपये द्यावे लागतील नाही तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी देऊन पैशाची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे.व उपरण्यात दगड बांधून दगडाने व चाकूने तोंडावर व उजव्या हातावर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे.त्यात ऋषिकेश महेरखांब हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान या वार्ताहरांकडून यापूर्वी ही अशा घटना वारंवार घडल्या असल्याच्या नागरिकांत मोठ्या चर्चा पसरल्या आहेत.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-८५/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३०८(४),११८(२),१२६,(२),३५१(२),३५२,३,(५) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे यांनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहेत.