कोपरगाव तालुका
…या आमदारांस मंत्रीपद मिळावे यासाठी महाभिषेक
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून त्यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश व्हावा यासाठी माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी आज ग्रामदैवत अमृतेश्वरला महाभिषेक करून प्रार्थना केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू झाले आहे.आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे.गेल्या दोन दिवसांपासून जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली.आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.त्यांनी कालच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता.त्यांची या पदाकरता बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे.तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना आता आपल्या मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे.कधी एकदा मंत्री होतो असे वाटू लागले आहे.त्याला नगर जिल्हा अपवाद नाही नगर जिल्ह्यात महायुतीच्या बारा जागांपैकी दहा जागा आल्या आहेत.त्यामुळे अनेक जण कॉलर ताट करून बागडत आहे.त्यातच वयाची अट लागल्याने त्यांचा जीव टांगून राहिला आहे.त्यात राष्ट्रवादीत अनेक जण नवीन असले तरी संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांना मंत्रिपदाचे अधिकचे वेध लागले आहे.त्यापाठोपाठ आ.आशुतोष काळे हे दुसऱ्यांदा १ लाख २४ हजार ६२४ इतक्या मोठ्या मतांनी निवडून आले आहे.हे मताधिक्य अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडून आलेल्या १२ आमदारांमध्ये एकचे आहे.त्यामुळे त्यांनी मागे राहण्याची गरज उरली नाही.त्यांच्या अपेक्षा रास्त मानाव्या लागतील.त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मागे राहिले नाही.त्यांनीही आपल्या आमदारांच्या नजरेत येण्यासाठी प्रयत्न मागे ठेवले नाही.त्यात तर आमदार काळे यांचे गाव असेल तर मागे राहण्याची गरज शिल्लक राहत नाही.आ.काळे उच्च शिक्षित असल्याचा त्यांचा दावा असून त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे.मागील पाच वर्षांत,त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचीस शेती सिंचनाच्या पाण्यासह राहिलेली कामे करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.उर्वरित कामासाठी त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.त्यांची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी आ.काळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून ग्रामदैवत अमृतेश्वर महादेव चरणी महाभिषेक करून ग्रामस्थांनी प्रार्थना केली आहे.यावेळी माहेगाव देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.काळे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी ग्रामदैवत अमृतेश्वरास महाभिषेक करतांना माहेगाव देशमुख ग्रामस्थ.