जाहिरात-9423439946
संपादकीय

‘लव्ह जिहाद’चा धोका कोपरगावच्या दारात ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात लव्ह जिहादच्या प्रकार उघड झाला असून हिंदू संघटना खडबडून जाग्या झाल्या असल्याचे दिसून येत असून त्यांनी काल दुपारी ०३ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असून आगामी गुरुवार दि.२० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे हा जनाक्रोश का करण्यात येतो असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे.त्यामुळे जुलै २०१७ मध्ये कोपरगावात विशिष्ट समाजाने आयोजित केलेला मोर्चा नक्कीच आठवत असेल व त्याचे पुढे काय झाले हे अनेकांच्या स्मरणात असेल.मुळात ‘लव्ह जिहाद’ हा का वाढला आहे ? त्यात दोन भिन्न धर्मियांना धर्मांतराची आवश्यकता आहे का ? लिव्ह इनची गरज का वाढली आहे ? मुलींना आधी प्रेमजाळ्यात फसवून निकाहसाठी आग्रह का धरला जातो.साठी नंतर मोर्चे आवश्यक आहेत का ? की आपल्या मुले-मुली यांना संस्काराची गरज निर्माण झाली आहे असे सवाल निर्माण झाले आहेत.

‘आपल्या संविधानामध्ये कोणत्याही नागरिकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे.पण दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात तेव्हा केवळ त्यासाठी एकाला आपला धर्म सोडावा लागावा ही चिंतेची बाब आहे.’कोपरगावात घडलेली घटना याच प्रकारातील असल्याचे प्रथमदर्शनी आहे त्यामुळे खरी चिंता निर्माण झाली आहे.त्यामुळे समाजातील असंतोष समजण्यासारखा मानला पाहिजे.

लव्ह ‘जिहाद’ हा एक अनधिकृत शब्द आहे जो कट्टर हिंदू गटाकडून वापरला जातो जो मुस्लिम पुरुषांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याच्या कटाला,’लव्ह जिहाद’ म्हणतात.’लव्ह जिहाद’ दोन शब्दांनी बनला आहे.इंग्रजी भाषेतील ‘लव’ या शब्दाचा अर्थ ‘प्रेम’ आणि अरबी भाषेतील शब्द ‘जिहाद’ असा होतो.याचा अर्थ एखादे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावणे.म्हणजे जेव्हा एका विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील मुलींना अडकवून त्यांचे धर्मांतर करतात,तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात.

‘श्रद्धा’ सारख्या तरुणी आधी प्रेम पुढे विवाह,लिव्ह इन वगैरेंच्या जाळयात का सापडतात या प्रश्नाला अनेक सामाजिक,कुटुंब व्यवस्थेचे पदर आहेत.त्याचा विचार समाजशास्त्र,कुटुंब संकल्पना,आचार विचार स्वातंत्र्य,संस्कार अशा अनेक अंगांनी व्हायला हवा,तसा तो चालूही झाला आहे.मात्र समाजात जशी जागृती हवी तशी अद्याप दिसून येत नाही.त्यामुळे त्यात वारंवारिता आढळून येत आहे.मध्ये ‘केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बऱ्या पैकी हिंदू संमत जागृती घडवली मात्र अद्यापही अशा घटना घडत आहे.त्यासाठी पालक जबाबदार नाही का ? असा सवाल पुढं आल्याशिवाय राहत नाही.एकीकडे विज्ञान,तंत्रज्ञानाची अनेक शिखरे पादक्रांत होत असतानाच्या युगात श्रद्धा सारख्या तरुणींच्या हत्येतून प्रकट होणारी अश्मयुगीन मानसिकता तयार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न धार्मिक स्थळातून होत आहेत हि खरी चिंतेची बाब आहे.व त्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर पैसा येतो असे वांरवार बातम्या वाचायला मिळतात हे विशेष.ही मानसिकता तयार करण्यासाठी पडद्यामागे राहून कार्यरत असणाऱ्या शक्तींना अटकाव करायचा की नाही ? की हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून निष्क्रिय बसायचे हा वर्तमानात कळीचा मुद्दा बनला आहे.अनेक विशिष्ट राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांचे अनुयायी विशिष्ट धर्माच्या नागरिकांचा धर्म लपविण्याचा प्रयत्न या पूर्वी दडून राहिला नाही.कोपरगाव शहर आणि तालुका त्यास अपवाद नाही.नुकतीच संगमनेर येथे गत महिन्यात घडलेली घटना त्याची साक्ष आहे.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड या रेल्वे जंक्शनमुळे प्रसिद्ध झालेल्या गावात मुस्लीम धर्मात प्रवेश करण्यासाठी धाकदपटशा,पैशाचे प्रलोभन याचा यथेच्छ वापर कसा होतोय याचे वृत्तांकन अलीकडेच एका वृत्त वाहिनीने केले होते.दौंड मध्ये या पद्धतीने सुमारे २०० हिंदू तरुणी तसेच विवाहित हिंदू पुरुषांचे धर्मांतर झाल्याचे वृत्त या वाहिनीने दिले होते.’लव्ह जिहाद’ हे दाहक वास्तव दुर्लक्षून चालणार नाही.एका मुस्लिम महिलेशी विवाह केलेल्या हिंदू इसमाची जबरद्स्तीने सुंता करून त्या व्यक्तीला मुस्लिम धर्मात प्रवेश कसा घ्यावयास लावण्यात आला याचे वृत्तांकन या वाहिनीने केले होते.पुण्यातही मुस्लिम तरुणीशी प्रेम विवाह केलेल्या हिंदू तरुणांना जबरदस्तीने मुस्लिम धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडण्याच्या चिंताजनक घटना घडल्या आहेत.त्यामुळे हा विषय गंभीर ठरतो आहे.

कोपरगावातील नेते विशिष्ट समाजाच्या तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी त्यासाठी बहुतांशी अशाच पद्धतीने वागुन आपल्या समाजावर अन्याय करताना अनेक वेळा दिसून आले आहे.त्यामुळे विशिष्ट समाजात त्यांच्या प्रति अनादर वाढला तर त्याला त्या समाजाला दोष देता येणार नाही.

दरम्यान या घटनेतील आरोपींना वाचविण्यासाठी सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यास दाद दिली नसल्याने तो बेत फसला आहे.

दरम्यान सन-२०१८ मध्ये ४४-४२-०२,दरम्यान सन-२०१९ मध्ये २५-२२-०३,दरम्यान सन-२०२० मध्ये २५-२३-०२,
दरम्यान सन-२०२१ मध्ये ४५-२३-०४, सन-२०२२ मध्ये ५२-४८-०४,सन-२०२३ चालू वर्षा मध्ये सहा महिन्यात १९-१७-०२ असे प्रमाण दिसून येत आहे.या चालू वर्षात अल्पवयीन मुली पळून नेत्याचे ०६ गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील उपनगरात दि.०४ जुलै २०१७ रोजी घडलेली घटना त्याचा आणखी पुरावा ठरावा.त्यावेळी विशिष्ट समाजाने नाशिक,त्यावेळचे औरंगाबाद व आजचे संभाजीनगर,मालेगाव,मनमाड आधी ठिकाणाहून मोठी गर्दी करत मोठा मोर्चा काढून,’कोपरगाव को जला देंगे’ अशा घोषणा येथील नागरिक विसरलेले नाही.त्यावेळी सदर मुलगी मूकबधिर असताना तिला मतिमंद ठरून व त्या घटनेला सामूहिक बलात्काराचा रंग देण्यात आला होता.येथील नेत्यांनी विशिष्ट मतावर डोळा ठेवून मोठ्या मदतीचा आव आणला होता.त्या तरुणाला नाहक बळी दिला होता.त्याबाबत तो पुढे निर्दोष सुटला हे आमच्या प्रतिनिधीने बातमी देऊन स्पष्ट केले आहे.त्या हिंसाचारात सहभागी झालेल्या अनेकांनी आपली चुकही कबूल केलेली आहे व त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या बातम्या पुढे खऱ्या ठरल्या होत्या.मात्र त्यावेळी आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयावर विशिष्ट समाजाने केलेला हल्ला कसा विसरता येईल ? व त्या साठी येथील नेत्यांनी घेतलेली एकांगी भूमिका अनेकांच्या स्मरणात आहे.त्याबाबतचे खटले अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत.त्यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची आयोजित केलेली बैठक त्यात कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,माजी नगरसेवक कैलास जाधव,व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली न्यायी व लक्षवेधी भूमिका वगळता बाकी स्थानिक व नजीकच्या तालुक्यातून मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांनी आपल्या मतांची बेगमी करण्यासाठी काय काथ्याकूट केला होता हे सर्वांना विदित आहेच. खऱ्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांची कशी शिकार केली होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही.त्याच नेत्यांनी विशिष्ट समाजाच्या तरुणांना हिंसा करण्यात नागरिकांना कसे प्रोत्साहित केले होते त्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या हे अनेकांच्या स्मरणात असेल.मात्र हीच मंडळी पुन्हा वर तोंड करून समाजाला उपदेश देण्यास आघाडीवर असतात असा निर्लज्ज पणा ज्या नेत्यांत असेल त्या तालुक्याची व शहराची कधी प्रगती होईल याचे दिवास्वप्न कोणी पाहत असेल त्यातून वेळीच बाहेर आलेले उत्तम.त्यामुळे या वास्तवावर चर्चा करणे खरेच गरजेचे आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात अशा ‘लव्ह जिहाद’च्या किती घटना घडल्या आहेत.व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून किती महिला आणि तरुणी गायब होतात यांचे आकडेवारी पाहणे गरजेचे ठरेल.

कोपरगाव तालुक्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटना अलीकडील काळात तरी घडलेल्या दिसत नाही.त्याची अद्याप तरी मोठी व्याप्ती नाही.मात्र त्यात काही सत्ताधारी व पदावर असलेल्या राजकीय हितेशी मंडळींचे जवळचे नातेवाईक सहभागी असावे हि साधिसोपी बाब नाही.त्याबाबत सत्ताधारी गट कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.याबाबत तरी त्यांनी आपले मौन सोडलेले नाही.त्यांना हा मोर्चा बोलता करणार का ? हा खरा सवाल आहे.याला विशिष्ट संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.त्याबाबत मात्र गायब महिला आणि तरुणीच्या बाबतीत आमच्या प्रतिनिधीने आकडेवारी जमा केली असून त्यात नुसत्या कोपरगाव शहरातून प्रति वर्ष किती महिला गायब होतात व परत किती येतात यांचे वास्तव समोर आणणे गरजेचे आहे.वास्तविक सर्व महिला आणि तरुणी या ‘लव्ह जिहाद’च्या शिकार होतात असे मात्र नाही तर त्याला बाकी कारणे त्याला जबाबदार आहे.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.त्यासाठी सालनिहाय अकडेवाडी पुढे दिली आहे.त्यात आधी साल,गायब महिला व त्या पुढे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन पुन्हा नातेवकांच्या ताब्यात दिलेल्या महिला व शोध न लागलेल्या महिलांची पाच वर्षातील आकडेवारी संख्या दर्शवली आहे.

दरम्यान सन-२०१८ मध्ये ४४-४२-०२,दरम्यान सन-२०१९ मध्ये २५-२२-०३,दरम्यान सन-२०२० मध्ये २५-२३-०२,
दरम्यान सन-२०२१ मध्ये ४५-२३-०४, सन-२०२२ मध्ये ५२-४८-०४,सन-२०२३ चालू वर्षा मध्ये सहा महिन्यात १९-१७-०२ असे प्रमाण दिसून येत आहे.या चालू वर्षात अल्पवयीन मुली पळून नेत्याचे ०६ गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशात ७-८ वर्षांपूर्वी अखलाक मोहम्मद या इसमाची गो मांस बाळगल्याच्या संशयावरून एका जमावाने हत्या केल्यानंतर वर उल्लेख केलेली विचारवंतांची मांदियाळी धाय मोकलून आकांत करत होती.श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते भल्या मोठ्या फ्रीज मध्ये ठेवण्याचा प्रकारावर मात्र गप्प बसताना दिसतात हा समाजातील नेत्यांना लागलेला मोठा रोग धोकादायक आहे.

या घटनांमागे हिंदू तरुणींचे-महिलांचे धर्मांतर करणे हाच प्रमुख उद्देश असल्याचे पीडित तरुणींच्या,आरोपींच्या जाबजबाबातून स्पष्ट झाले आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोव्हेंबर-२०२२ मध्ये अशा घटनेतील विवाहासंदर्भात निकाल देताना केलेले मतप्रदर्शन ‘लव्ह जिहाद’ मधील आरोपींची कृत्यामागचा हेतू,कार्यपद्धती धर्मांतरणाचीच होती हे स्पष्ट करणारे आहे.सज्ञान असलेल्या हिंदू तरुणीला आपला धर्म बदलून मुस्लिम मुलाशी विवाह करण्याचा अधिकार आहे हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले.मात्र दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात,तेव्हा केवळ त्या विवाहासाठी एका व्यक्तीला आपला धर्म सोडायला सांगणं,त्या व्यक्तीवर आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती करणे ही चिंतेची बाब आहे असे मत या प्रकरणात न्यायालयाने व्यक्त केले आहे.

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की,”आपल्या संविधानामध्ये कोणत्याही नागरिकाला कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे.पण दोन भिन्नधर्मीय व्यक्ती जेव्हा विवाह करतात तेव्हा केवळ त्यासाठी एकाला आपला धर्म सोडावा लागावा ही चिंतेची बाब आहे.’कोपरगावात घडलेली घटना याच प्रकारातील असल्याचे प्रथमदर्शनी आहे त्यामुळे खरी चिंता निर्माण झाली आहे.त्यामुळे समाजातील हिंदू समाजातील संघटना आणि नागरिक मोर्चा काढीत असतील त्यांना चुकीचे ठरवता येणार नाही.आता नागरिक किती जागृत झाले आणि किती प्रतिसाद देणार याकडे अ.नगर जिल्ह्याचे आणि कोपरगाव तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.यात पोलिसांची भूमिका काय राहणार आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.मात्र ते काहीही असले तरी ‘लव्ह जिहाद’चा धोका आता दूर राहिला नाही तो कोपरगावकरांच्या दारात आला आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.त्यासाठी मुस्लिम विचारवंतांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यासह सर्वांना विश्वासात घेण्याची गरज मात्र प्रकर्षाने निर्माण झाली आहे.त्यामुळे हा तणाव निवळण्यास मदत होणार आहे हे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close