कोपरगाव तालुका
जनार्दन कदम यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावचे प्रगतशिल शेतकरी व माहेगाव ग्रामिण पतसंस्थेचे उपाध्यक्ष जनार्धन तात्याबा कदम ( वय ६० ) यांचे नुकतेच त्यांच्यानिवास स्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्त दत्तु कदम यांचे ते चुलते होते.
त्यांच्या मागे दोन भाऊ पत्नी एक मुलगा दोन मुली पुतणे असा परिवार आहे.माहेगाव ग्रामिण पतसंस्थेचे संस्थापक अॅड दिलीप लासुरे,अध्यक्ष बाळसाहेब भगुरे, पतसंस्थेचे व्यवस्थापक विजय कदम यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच सभासदां सह मोहगाव ,कुंभारी धारणगाव , हिंगणी , कोळपेवाडी येथील नागरीकांनी जनार्धन कदम यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे .