नगर जिल्हा
व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे घेतले व्यापारी महासंघाने लक्ष वेधून
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व्यापारी संघटनांची दुरचित्रवाणीद्वारे चर्चा करून किराणा व्यापाराच्या विविध अडचणीं संदर्भात जिल्हाधिकारी निवेदन दिल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
देशभरात १४ एप्रिल पर्यंत केंद्रसरकारने लॉक डाऊन जाहीर केल्याने व त्यात व्यापाऱ्यांची दुकाने अत्यावश्यक सेवेत २४ तास समाविष्ट केल्याने व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.सरकारने व्यापारांना नफेखोरी व साठेबाजी न करण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे मोठा विरोधाभास निर्माण झाल्याने व्यापारी महासंघाची अडचण झाली आहे.
जगभरात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला असून अमेरिका व इटली,स्पेन आदी देशातही या विषाणूने पीडित रुणांची आता हजारोच्या संख्येत वाढ होत असताना आपल्या देशात २६३९ जणांना लागण झाली असून ५६ नागरिकांचा बळी गेला आहे.देशभरात १४ एप्रिल पर्यंत केंद्रसरकारने लॉक डाऊन जाहीर केल्याने व त्यात व्यापाऱ्यांची दुकाने अत्यावश्यक सेवेत २४ तास समाविष्ट केल्याने व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.सरकारने व्यापारांना नफेखोरी व साठेबाजी न करण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे मोठा विरोधाभास निर्माण झाल्याने व्यापारी महासंघाची अडचण झाली आहे.त्यामुळे कोपरगाव व्यापारी महासंघाने या बाबत केंद्र व राज्य शासनाकडून निघणा-या आदेशामधील विरोधाभास नजरेस आणुन दिला आहे.
शासनाने माल पुरवठा केल्यास व्यापारी दिवसभर दुकाने उघडी ठेऊ शकतात मात्र ते शक्य दिसत नाही.वाहतूक, विविध कर तसेच वाजवी नफा समाविष्ट करून किंवा ना नफा-ना तोटा या तत्वावर देखील विक्री करण्याची संघटनेची तयारी आहे.किराणा व्यापारांवर अजाणतेपणी झालेल्या चुकांबाबत प्रशासनाकडून गुन्हे दाखल झाल्यास भीतीमुळे किराणा दुकानदार दुकान उघडे ठेवण्यास घाबरत आहे-सुधीर डागा,सरचिटणीस
ग्रामीण भागामध्ये २४ तास अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याची आवश्यक्ता नाही संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव या शहरांमध्ये व्यापारी संघटनांनी ३ ते चार दिवस व दररोज ४ ते ५ तास दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु याबाबत कोणाचे स्पष्ट निर्देश नसल्याचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापी संघटनांच्या वतीने दिलेल्या निवेदनात किराणा दुकानदार हि व्यक्ती म्हणून त्याच्या आरोग्याची देखील शासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. २४ तास अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेशाने व्यापाऱ्यांचे कुटुंब देखील धास्तावलेले आहे.माल अपेक्षित वेळेत मिळणे बंद काळात अशक्य होत आहे.शासनाने माल पुरवठा केल्यास व्यापारी दिवसभर दुकाने उघडी ठेऊ शकतात मात्र ते शक्य दिसत नाही.वाहतूक, विविध कर तसेच वाजवी नफा समाविष्ट करून किंवा ना नफा-ना तोटा या तत्वावर देखील विक्री करण्याची संघटनेची तयारी आहे.किराणा व्यापारांवर अजाणतेपणी झालेल्या चुकांबाबत प्रशासनाकडून गुन्हे दाखल झाल्यास भीतीमुळे किराणा दुकानदार दुकान उघडे ठेवण्यास घाबरत आहे. तसेच अनेक वस्तु ठोक बाजारातच उपलब्ध होऊ शकत नाही. कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनशेठ झंवर म्हणाले कि, व्यापाऱ्यांना घरून दुकानात जाताना तसेच गोडाऊन मधून माल दुकानात आणताना पोलीसांकडून अनेक ठिकाणी असभ्यतेची वागणुक देण्याची धोका दुकानदारांना वाटत आहे. त्यामुळे शासनाने किराणा दुकानदारांना व त्यांचे कामगारांना संरक्षण उपलब्ध करून द्यावे किंवा तहसील कार्यालयाचे शिक्के असलेले पोस्टर्स उपलब्ध करून द्यावेत.
या निवेदनावर अहमदनगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे, संगमनेर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, बेलापूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, राहाता मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजित धाडीवाल, राहुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, कोल्हार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंगवी यांच्या सह्या आहेत.दुरचित्रवाणीचे संचलन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे महासचिव सुधीर डागा यांनी केले.