जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात शेतकऱ्याने वाटला मोफत भाजीपाला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोनाच्या साथीने रान माजवलेले असून व आर्थिक दुर्बल घटकांच्या नागरिकांचे जगण्याचे हाल होत असताना अनेक दानशूर नागरिक त्यांना जगण्यास सहाय्य करताना दिसत असून कोपरगाव तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी तथा प्राध्यापक मोहनराव दत्तात्रय सांगळे यांनी आपले दोन एकर वांगी व एक एकर टोमॅटो नागरिकांना वाटपासाठी खुले करून दिले आहे.एवढेच नाही तर त्यांनी आज स्वखर्चाने ते तोडून नागरिकांना सकाळी आपल्याच ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोपरगाव शहरात अडचणीच्या काळात नागरिकांना मोफत वाटप केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्याचा व देशाचा शेतकरी हा तर अन्नदाता मानला जातो त्याने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले आहेच.पण अन्नधान्याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.मात्र या शेतकऱ्याचे दैन्य मात्र शेतमालाला भाव मिळत नसल्याने फिटण्याची चिन्हे अनेक सरकारे बदलूनही दिसत नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या अद्याप नाव घेत नाही.मुदलात त्याला केवळ त्याच्या मालाला रास्त भाव हवा आहे.दुसरे कर्जमाफीचे उताऱ्यांची त्याला अपेक्षा नाही.मात्र मतांवर डोळा ठेऊन राजकीय पक्ष व त्यांचे नेते हा डाव हमखास खेळत असतात.म्हणून या दात्याचे दातृत्व अद्याप संपलेले नाही.

देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असलेल्यांचे सामान्य नागरिक मजूर आदींचे हाल होत आहेत.

अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.यात सर्वाधिक हाल हातावर पोट असलेल्या नागरिकांचे,मजुरांचे होत आहे.त्यांना जगण्यासाठी सहाय्यभूत होण्यासाठी अनेक संघटना बाहेर पडत आहेत.राज्याचा व देशाचा शेतकरी हा तर अन्नदाता मानला जातो त्याने देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले आहेच.पण अन्नधान्याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.मात्र या शेतकऱ्याचे दैन्य मात्र शेतमालाला भाव मिळत नसल्याने फिटण्याची चिन्हे अनेक सरकारे बदलूनही दिसत नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या अद्याप नाव घेत नाही.मुदलात त्याला केवळ त्याच्या मालाला रास्त भाव हवा आहे.दुसरे कर्जमाफीचे उताऱ्यांची त्याला अपेक्षा नाही.मात्र मतांवर डोळा ठेऊन राजकीय पक्ष व त्यांचे नेते हा डाव हमखास खेळत असतात.म्हणून या दात्याचे दातृत्व अद्याप संपलेले नाही.ज्या वेळी देशातील नागरिक अडचणित येईल त्यावेळी हाच शेतकरी मदतीला धावून आल्या शिवाय रहात नाही.याची अनेक उदाहरणे या देशांत आहेत.याचाच अनुभव वर्तमानात आला असून सोनारी येथील शेतकरी प्रा.मोहनराव सांगळे यांनी कोरोनामुळे आपले देशबांधव अडचणीत आल्याचे ओळखून आपला जो उपलब्ध शेतमाल वांगे आणि टोमॅटो लागलीच स्वःखर्चाने मोहन पवार,कचरू भवर, संतोष सोनवणे या मजुरांमार्फत तोडून थेट कोपरगाव शहरातील अडचणीत आलेल्या नागरिकांना गल्लीत फिरून पोहच केला आहे.

निवारा,सुभद्रानगर,ओमनगर,सह्याद्री कॉलनी,बाजार समिती परिसर या उपनगरात याचे वाटप त्यांनी राज्य पतसंस्थां फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते नुकतेच केले आहे.त्यावेळी संदीप कोयटे,नगरसेवक जनार्दन कदम,प्रताप जोशी,विष्णूपंत गायकवाड,अमोल राजूरकर,विवेक जोशी,दशरथ चारवान, संतोष बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close