कोपरगाव तालुका
कुंभारीत वादळी पावसाने मोठे नुकसान !
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(संजय भारती)
कोपरगाव तालुक्यात नुकत्याच कोसळलेल्या अवकाळी पावसाने कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून अनेक झाडे चारचाकी,दुचाकी वाहनावर कोसळली असून येथील शेतकरी दशरथ चंदनशिव यांची सात हजारांची शेळी मृत्युमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे.त्यामुळे या शेतकऱ्याचे व वाहन मालक सतीश कदम,अनिल अर्जुन गुंजाळ व एका पाहुणे आलेल्या इसमाच्या डस्टर कारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.कुंभारी गावात वादळी पावसाचे मोठे थैमान घातल्याने सतीश कदम यांच्या जे.सी.बी.चे अनिल गुंजाळ यांच्या दोन दुचाकींवर झाड कोसळले,गावठाण हद्दीत दशरथ चंदनशिव यांच्या गोठ्यावर झाड कोसळून सात हजारांची शेळी मृत्यू मुखी पडली आहे.
कोपरगाव तालुक्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.अद्यापही पाऊस येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.पहिल्या दिवशी झालेल्या पावसाने केवळ चांदगव्हाण येथील एका शेतकऱ्याच्या घराच्या छतांचे पत्रे उडाले होते.अन्यत्र तालुक्यात उभ्या रब्बी पिकांचे थोडे बहुत नुकसान झाले होते.मात्र दुसऱ्या दिवशी मात्र शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.कुंभारी गावात वादळी पावसाचे मोठे थैमान घातल्याने सतीश कदम यांच्या जे.सी.बी.चे अनिल गुंजाळ यांच्या दोन दुचाकींवर झाड कोसळले,गावठाण हद्दीत दशरथ चंदनशिव यांच्या गोठ्यावर झाड कोसळून सात हजारांची शेळी मृत्यू मुखी पडली आहे.
विद्युत केंद्राच्या रस्त्यालगत रवी वाघ यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांची डस्टर कार वर झाड पडल्याने त्यांचे कारचे मोठे नुकसान झाले आहे.राघवेश्वर मंदिराची कामं रस्त्यालगत होती होती ती ही या वादळाच्या तडाख्यात सापडून उन्मळून पडली आहे.सुमारे पाच वहानांचे नुकसान झालेच पण सार्वजनिक वाचनालयाच्या जवळ सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे झाडही उन्मळून पडले आहे.या घटनेचा तेथील तलाठी एस.एम.साबणे यांनी पंचनामा केला असून घटनास्थळी कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,सरपंच प्रशांत घुले पोलीस पाटील उल्हास मेढे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.