शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी मनावर कोणताही दबाव येऊ न देता परीक्षा द्यावी-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळांत परीक्षा देताना मनावर कोणताही दबाव येऊ न देता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून द्याव्यात असे प्रतिपादन अड्.योगेश खालकर यांनी उक्कडगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“शालांत परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मनावर अनामिक ताण असतो मात्र तो त्यांनी वेळीच झटकून मोकळ्या मनाने व आत्मविश्वासाने जर परीक्षेला सामोरे गेले तर त्यांना निश्चित यश मिळते”-शिवाजीराव लावरे,संस्थापक,ग्रामीण अवर्षण विकास संस्था,खडकेवाके.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशिलामाई काळे येथील माध्यमिक विद्यालयात नुकताच माध्यमिक शाळांत परीक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थित निरोप देण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक शिवाजीराव लावरे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे सदस्य अड्.योगेश खालकर,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक व पत्रकार नानासाहेब जवरे,शाळेचे संस्थापक शिवाजीराव लावरे,मुख्याध्यापक विलास शेळके,शिक्षक बाळासाहेब नेहे,अण्णासाहेब राजगुरू,वर्गशिक्षक गोकुळ जपे सर आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी विद्यार्थ्यांना पत्रकार नानासाहेब जवरे,मुख्याध्यापक विलास शेळके,बाळासाहेब नेहे,गोकुळ जपे सर आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थीं वैभव भगत,ऋतुजा दाणे,राणी देखणे,तेजस्विनी शिंदे,अचल बोंबले आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन कु.तृती गव्हाळे,अर्चना निकम,यांनी केले तर आभार अण्णासाहेब राजगुरू यांनी मानले आहे.