शैक्षणिक

‘पी.एम.यशस्वी’ शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयाचे ३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी मार्फत ‘यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“आत्मा मालिक शैक्षणिक संकूल व अथर्व फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने इ.७ वी पासून विदयार्थ्यांची फांउडेशन वर्गाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षाची तयारी करून घेली जाते.अभ्यास क्रमाचे योग्य नियोजन,अनुभवी प्रशिक्षित शिक्षक नियमित सराव यामुळे हे यश प्राप्त झाले आहे”-निरंजन डांगे,प्राचार्य,आत्मा मालिक शैक्षणिक संकूल,कोकमठाण.

संपूर्ण देशात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याचा मान आत्मा मालिकने मिळविला आहे.ही परीक्षा इयत्ता ९ वी व ११ वी या वर्गासाठी घेतला जातो. गुणवत्ता यादीत येणाया इ.९ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी मिळते.आत्मा मालिक च्या इ.९ वी च्या ३७ विद्यार्थ्यांना दोन वर्षात ५५ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाविण्याचा बहूमान पटकविला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,फांऊडेशन विभाग प्रमुख सचिन डांगे,अथर्व फांऊडेशनचे संचालक नंदकुमार भाटे,डॉं.राहुल मिश्रा,क्षितीज मिश्रा,शिवम तिवारी,वर्ग शिक्षक राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले होते.विद्यार्थ्यांच्या या यशाचे आत्मा मालिक ध्यानपीठाचे आत्मा मालिक माऊली व संत मांदियाळी तसेच अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close