जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील विरोधकांना जगविण्याची..यांची आर्त हाक ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


   कोपरगाव तालुक्यात आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे हे एकमेकांचे विरोधक केवळ विधानसभा निवडणुकीपूरते असून तालुक्यात विरोधक शिल्लक राहिला नाही त्यामुळे तालुक्यात हुकूमशाही येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला असल्यानेच तालुक्यात आमच्या सारख्या विरोधकांना जिवंत ठेवा असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी कोपरगाव येथे आज पत्रकारांना सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

  

“आम्ही आयुष्याची चाळीस वर्ष राजकारणात घातले पण उपयोग झाला नाही.पक्षात वरिष्ठ नेत्यांनी बाहेरच्या (काँग्रेसी) चोरांना आत घेऊन पक्षाची वाताहत लावली आहे.तीच अवस्था तालुक्यातील कार्यकर्त्यांची झाली आहे.शहर आणि तालुक्यात विरोधक शिल्लक राहिला नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा समज निर्माण झाला आहे”-बाळासाहेब जाधव,कार्यकर्ते,कोपरगाव.

दि.०६ जानेवारी रोजी दर्पणकार यांनी आपला दर्पण हा अंक प्रसिद्ध केल्याने हा दिवस,’मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ पासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे.लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग,वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे,समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.दरम्यान कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या वतीने कोपरगाव शहर आणि तालुक्यातील पत्रकारांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज पाच दिवसांनी उशिरा,’पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे,कोपरगाव वकील संघाचे सदस्य अड्.दिलीप लासुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”तालुक्यात तिसरी शक्ती निर्माण होणे गरजेचे आहे मात्र वरिष्ठ पक्ष आणि त्यांचे नेते समायोजन करून त्यांच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असून शेजारी तालुक्यातील नेते आयात केले तरी चालेल पण आता तालुक्यात परिवर्तन करा असे आवाहन त्यांनी केले आहे.सवत असल्याशिवाय विकास होत नाही.तालुक्यात त्याची गरज आहे.पत्रकारांनी आपल्या चारित्र्यावर संशय निर्माण होऊ देऊ नये.आम्ही आयुष्याची चाळीस वर्ष राजकारणात घातले पण उपयोग झाला नाही.पक्षात वरिष्ठ नेत्यांनी बाहेरच्या (काँग्रेसी) चोरांना आत घेऊन पक्षाची वाताहत लावली आहे.तीच अवस्था तालुक्यातील कार्यकर्त्यांची झाली आहे.शहर आणि तालुक्यात विरोधक शिल्लक राहिला नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा समज निर्माण झाला आहे.अन्यथा वर्तमान आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यालयाची जागा आजी-माजी आमदारांनी चोरली नसती असा आरोप केला आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषद कारभारावर टिका करताना ते म्हणाले की,”वर्तमान काळे-कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरु केले असून ठेकेदारांची टोळी आपल्या हाताशी धरली आहे.व तालुक्यात लुटारूंची टोळी तयार केली असून कोपरगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी गोसावी यांना हाताशी धरून ती लूट राजरोस चालू असल्याचा आरोप केला आहे.असे नसते तर महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे ५१ एकराचे अतिक्रमण आपण पंधरा दिवसात काढतो असे लेखी आश्वासन देऊन त्यांनी ते कायम केले नसते असा आरोप केला आहे.उच्च न्यायालयाचे आदेश असताना त्यास अभय दिले जात आहे.याला जबाबदार कोण आहे ? व ते न काढण्यास दुसरे कोणते कारण आहे ? असा जाहीर सवाल त्यांनी केला आहे.

    

“कोपरगावात नेते शेतकऱ्यांनी आपल्या पैशातून उभ्या केलेल्या सहकारी संस्थांमधील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी राजरोस पैसे घेत असल्याचा वास्तवदर्शी आरोप केला आहे”-अड्.दिलीप लासुरे,कोपरगाव.

सदर प्रसंगी बोलताना ऍड.दिलीप लासुरे यांनी,”आपण काही वर्षांपूर्वी कोसाकात शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता.त्याला सर्व पत्रकारांनी साथ दिली होती.आज चित्र बदलले आहे.त्यावेळच्या पत्रकारांनी साक्ष द्यायला विरोध केला होता याची आठवण करून दिली आहे.त्यावेळी माजी खासदार व ऍड.भीम बडदे यांनी साक्ष दिली होती.तो निकाल माजी खा.शंकरराव काळे यांच्या विरोधात गेला त्यावेळी त्यांनी आपले पाय धरले असल्याची आठवण करून दिली व त्यावेळी आपण माघार घेतली असल्याचे आठवण करून दिली आहे.

  कोपरगावात नेते शेतकऱ्यांनी आपल्या पैशातून उभ्या केलेल्या सहकारी संस्थांमधील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी राजरोस पैसे घेत असल्याचा वास्तवदर्शी आरोप केला आहे.त्यावेळी पत्रकारांचे विविध किस्से ऐकवले आहे.कोपरगाव तालुक्यातील नेत्यांच्या तीन पिढ्या चोर आहे असल्याचे निक्षून सांगितले आहे.वर्तमानात कोपरगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला आहे.महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन देऊन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पाळले नाही.त्यांना आम्ही नोटीस काढली आहे.व बदलीची मागणी केली आहे.शहरात अतिक्रमण केल्यावर गरिबांच्या टपऱ्या ताबडतोब काढल्या असत्या मात्र शहरातील बड्या धेंडांच्या ताब्यात असलेले महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे सुमारे २५० कोटींच्या मालमत्तेवर अतिक्रमण मात्र का काढले जात नाही ? असा तिखट सवाल केला आहे.त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे.त्यामुळे पत्रकारांनी खरी पत्रकारिता करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

 

सदर प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे यांनी वर्तमान काळात आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीत जाऊनही काँग्रेसचे कार्यालय चोरले असून स्वतःच्या घरातील विश्वस्त केले असल्याचा आरोप केला आहे.व त्यास काँग्रेस मधील नैऋत्येकडील माजी मंत्र्यांनी साथ दिली असल्याचा धक्कादायक आरोप करून मात्र आम्ही आवाज उठवूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे.अशा नेतृत्वास लोक कसे निवडून देतात असा तिखट सवाल शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close