शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील…या महाविद्यालयास नुकताच ‘नॅक’ दर्जा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशिलामाई काळे महाविद्यालयास नुकतीच ‘नॅक’ समितीने मूल्यांकनासाठी भेट दिली होती.महाविद्यालयाच्या सर्व पायाभूत सुविधा शैक्षणिक सुविधांची तपापसणी करून महाविद्यालयाला पहिल्याच प्रयत्नात ‘बी’ ग्रेड मिळविण्यात यश आले आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सन-२००५ च्या दरम्यान सर्व महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडेशन कौउन्सिलने (‘नॅक’) चे मूल्यांकन तसेच दर पाच वर्षांनी पुनर्मूल्यांकन अनिवार्य केले असून त्यानुसार महाविद्यालयांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक महाविद्यालयातील भौतिक सुविधा,गुणवत्ता व अन्य बाबी नॅक समितीमार्फत तपासण्यात येतात.त्यानुसार केलेल्या तपासणीत या महाविद्यालयाला हे यश मिळाले आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सन-२००५ च्या दरम्यान सर्व महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडेशन कौउन्सिलने (‘नॅक’) चे मूल्यांकन तसेच दर पाच वर्षांनी पुनर्मूल्यांकन अनिवार्य केले असून त्यानुसार महाविद्यालयांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक महाविद्यालयातील भौतिक सुविधा,गुणवत्ता व अन्य बाबी नॅक समितीमार्फत तपासण्यात येतात.त्यानंतर महाविद्यालयांना वर्गवारी जाहीर करण्यात येते.त्या वर्गवारी आधारावर महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) अनुदान मिळते.विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्चशिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’कडून मूल्यांकन करुन घेणे आवश्यक आहे.यासाठी राज्य शासनाकडून महाविद्यालयांना वारंवार सूचनाही देण्यात आल्या. मात्र,त्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील काही महाविद्यालयांनी नॅकद्वारे मूल्यांकन करून घेण्यास वारंवार टाळाटाळ केली.त्यामुळे अनेक महाविद्यालयांचे वेतन अनुदान बंद असून,नवीन पदे भरण्यास बंदी केली होती. नवीन विषय किंवा तुकडी घेण्यासाठीही ‘नॅक’द्वारे मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या महाविद्यालयाने आपले मुक्यांकन करून घेतले आहे.त्यात त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
त्यानुसार नॅक समितीने सुशिलामाई काळे महाविद्यालयाची मागील आठवड्यात दि.१५ व १६ जून रोजी तपासणी केली होती.महाविद्यालयाची तपासणी करून उपलब्ध शैक्षणिक,पायाभूत सुविधा,विद्यार्थी,पालकांचे अभिप्राय व इतर बाबींची सखोल परिक्षण करून त्यानुसार महाविद्यालयास २.३३ (सी.जी.पी.ए.) गुण देऊन ‘बी’ श्रेणी प्रदान केली आहे.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे,सहसचिव स्नेहलता शिंदे,महाविद्यालय विकास समितीचे विविध पदाधिकारी आदींनी महाविद्यालयाचे कौतुक केले आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.विनोद मैंद,त्याच बरोबर सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले त्यामुळे ‘नॅक’ मानांकन प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.