शैक्षणिक
परजणे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखली असून विज्ञान विभागाचा निकाल ९८.३८ टक्के वाणिज्य विभागाचा ९५.६५ टक्के तर कला विभागाचा ६५ टक्के लागला असून विज्ञान विभागातुन कु.वारकर रोहिनी दगू हिस ६८ टक्के मार्कस मिळवून प्रथम त्याचप्रमाणे वाणिज्य विभागातुन कु.पगारे विजया सुनील ८४.५० टक्के मार्कस मिळवून प्रथम क्रमांक तसेच कला विभागातून कु.नवले प्रतीक्षा दगू ६६.८३ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला आहे.त्यात या महविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे राधाकृष्ण विखे पा.प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा शालिनी विखे तसेच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पालक तसेच प्राचार्य सदाफळ तसेच सर्व शिक्षक ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.