शैक्षणिक
लोकनेते वाजे अभ्यासिकेला…यांचेकडून पुस्तकांची भेट
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते तथा पंचाळे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांच्या माध्यमातून लोकनेते वाजे अभ्यासिका तसेच अहिल्यादेवी होळकर धार्मिक ग्रंथालय,सिन्नर याठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी १०० पुस्तके आणि धार्मिक ग्रंथ भेट देण्यात आले आहे.माजी आ.राजाभाऊ वाजे आणि शिवसेना नेते राजेश गडाख यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय.ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस.आर.रंगनाथन यांच्या मते,ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे.एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय.शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच.यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते.लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते त्यामुळे तरुण पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महेश थोरात यांनी पुस्तक चळवळ सुरु केली आहे.
बदलत्या काळात दृक्श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत असली तरी ग्रामीण भागात आजही पुस्तकांचे महत्व वादातीत आहे.त्या मुले ग्रंथालये आजही शिक्षणाचा श्वास आहे.त्यासाठी ग्रंथालय चळवळ आजही ग्रामीण भागात तितकीच महत्वाची आहे.हि गरज ओळखून पंचाळे येथील कार्यकर्ते महेश थोरात यांनी पुस्तके संकलन करून त्याचे वितरण करण्याची एक स्तुत्य चळवळ सुरु केली आहे.
सदर प्रसंगी राजाभाऊ वाजे,राजेश गडाख,अशोक घुमरे,भाऊसाहेब गडाख,मनोज सोनवणे, प्रशांत रायते,शाम गडाख आदी मान्यवर उपस्थित होते.
थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून “पुस्तक दान” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून दात्यांकडून पुस्तकांचे दान स्विकारतात.विशेतः एम.पी.एस.सी.यू.पी.एस.सी.,बँक,पोलीस आणि सैनिक पूर्व भरती आदी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचे दान मिळावे असे आवाहन सामाजिक संकेत स्थळाचे माध्यमांतून वारंवार करून पुस्तकांचे संकलन करून ही पुस्तके आवश्यक ठिकाणी भेट देण्यात येतात.या उपक्रमातून आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच होतकरू विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके थोरात यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली आहे.
लोकनेते अभ्यासिकेत देण्यात आलेली पुस्तके ही मंत्रालयीन कक्ष अधिकारी प्रसाद सांगळे,डॉ. महेश खैरनार,डॉ. वंदना सांगळे यांच्याकडून दान स्वरूपात थोरात यांनी स्वीकारली होती. भविष्यात देखील इच्छुक दात्यांनी थोरात यांच्या पुस्तक दान उपक्रमाला प्रतिसाद देऊन पुस्तकांचे दान द्यावे परिणामस्वरूप गरजू विद्यार्थी आणि वाचक यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहच करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येईल असे आवाहन सिन्नरचे माजी आ.राजाभाऊ वाजे यांनी केले आहे.