शैक्षणिक
नवनेतृत्व निर्माण होण्यात मतदार,मतदान आणि तरुण महत्वाचे-डॉ.जोशी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय लोकशाहीमध्ये नवं नेतृत्व निर्माण होण्यात नूतन मतदार,मतदान आणि तरुण हे घटक मोलाची भूमिका निभावत असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील प्रसिद्ध मानसतज्ज्ञ डॉ.ओंकार जोशी यांनी व्यक्त केले.
स्कुलचे माजी प्रतिनिधी चि.सिद्धांत जोशी व राजहंस आढाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करून मागील वर्षी आलेले अनुभव कथन केले तर मुख्य प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या अथर्व बेरगळ व दिवा सांड यांनीही मनोगत व्यक्त केले.या वेळी राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूल येथे नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींशी निवडणूक संपन्न झाली त्या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,विश्वस्त स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन मंडळ,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी निवड झालेल्या प्रतिनिधींनी पदभार स्वीकारल्यानंतर वाद्याच्या तालावर मार्च पास सादर केला.शिक्षिका शोभा चव्हाण यांनी सर्व प्रतिनिधींकडून पदग्रहणाची शपथ वदवून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्तविक माध्यमिक विभागप्रमुख शिल्पा वर्मा यांनी केले.
यावेळी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे मतदान घेऊन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये इयत्ता ९ वी तील विद्यार्थी अथर्व बेरगळ आणि दिवा सांड या दोघांची मुख्य प्रतिनिधी म्हणुन मतदानाच्या आधारे निवड झाली. सहाय्यक मुख्य प्रतिनिधी म्हणुन अंश शिंदे, इशिका वर्मा,शैक्षणिक प्रतिनिधी म्हणुन गणेश गवळी, सहाय्यक प्रतिनिधी सिद्धांत मिलानी,सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी संजना विभूते,सहाय्यक कार्यक्रम प्रतिनिधी अनय देशमुख,शिस्त प्रतिनिधी म्हणुन तनुष्का राजेभोसले,सहाय्यक शिस्त प्रतिनिधी नक्षत्रा जपे,स्वच्छता प्रतिनिधी भावेश बोथरा,सहाय्यक स्वच्छता प्रतिनिधी कृष्णा गुप्ता, क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार,सहाय्यक क्रीडा प्रतिनिधी अजिंक्य वाथोरे आदींची निवड विविध पदांवर लोकशाही पद्धतीने झाली.
स्कुलचे माजी प्रतिनिधी चि.सिद्धांत जोशी व राजहंस आढाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करून मागील वर्षी आलेले अनुभव कथन केले तर मुख्य प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या अथर्व बेरगळ व दिवा सांड यांनीही मनोगत व्यक्त केले.या वेळी राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता ९ वीच्या आदिती खालिया व संस्कृती कदम यांनी केले.उपस्थितांचे आभार शिक्षक संग्राम ताम्हाणे यांनी मानले.