शैक्षणिक
शिर्डीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचा समाज कल्याणविभाग व शिक्षण विभाग,पंचायत समिती राहाता व शिर्डी येथील श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच ‘जागतिक दिव्यांग दिन’विद्यालय स्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयात दरवर्षी ‘जागतिक दिव्यांग दिन’ प्रवेशित विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचे समवेत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेऊन साजरा करण्यात येतो.
जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालयात दरवर्षी ‘जागतिक दिव्यांग दिन’ प्रवेशित विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचे समवेत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेऊन साजरा करण्यात येतो.मात्र कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शासन आदेशाचे अनुपालन करत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय-योजनांचे काटेकोर पालन करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला आहे.
शिर्डी येथील पत्रकार बाबा मणियार यांचे शुभ हस्ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच राहाता तालुक्यातील व शिर्डी परिसरातील अस्थिव्यंग व कर्णबधिर या दिव्यांगांच्या धावणे,रांगोळी,संगीत खुर्ची या स्पर्धाचे उदघाटन करून स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.तसेच विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअँपच्या माध्यमातून चित्रकला,हस्तकला,रांगोळी व मेहंदी स्पर्धा यांचे आयोजन विद्यालयाचे वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित सर्व दिव्यांग व विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव कार्यक्रम पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी उपस्थित दिव्यांगाना विद्यालयाचे वतीने शैक्षणिक साहित्य,नॅपकिन,जेवणाचा डब्बा,पुष्प गुच्छ व हिवाळा ऋतूचे औचित्य साधून उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.श्री वाकचौरे यांनी उपस्थित दिव्यांगांना शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले आहे.
दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेली सेवा हि जीवणात ऊर्जा निर्माण करते असे प्रतिपादन विद्यालय संस्थापक,मुख्याध्यापक माधवराव चौधरी यांनी यावेळी केले आहे.
या प्रसंगी श्री साई अपंग विकास महिला मंडळाच्या सरचिटणीस वैशाली चौधरी,प्रहार दिव्यांग जनशक्ती संघटना राहाता तालुका अध्यक्ष दिनेश शेळके,उपाध्यक्ष विजय काकडे,दिव्यांग संघट्ना जिल्हा विभागीय अध्यक्ष जगन्नाथ सरोदे,दिव्यांग संघटक नितिन चौधरी,सुरेश गुगळे,वसंत काळे,जाकिर पठाण आदी उपस्थित होते.तसेच बापूराव दाभाडे,दत्तात्रय वहाडणे,सुदाम गोंदकर,राजेंद्र गोंदकर,अशोक गोर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व दिव्यांगांना विशेष शिक्षिका श्रीमती एस.एस.कवडे तसेच विशेष शिक्षक वाय.ए.पाटील यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम-२०१६ या कायद्याची माहिती दिली आहे.
सदर कार्यक्रम राबविण्यासाठी विद्यालय-वसतिगृह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून प्रयत्न केले आहे.