शैक्षणिक
चासनळी येथील महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक विद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.या महाविद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा या वर्षी कायम राहिली असल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत.पाडेकर वेदांत संजय एकूण टक्के – ७३.५०%,गाढे जयेश अनिल एकूण टक्के ७३.००%,भवर कृष्णा नवनाथ एकूण टक्के – ७२.०० % मिळवून तृतीय आला आहे.तर
१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल ९४ % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
कु.पवार पायल राजेंद्र एकूण टक्के – ७५.२३% प्रथम क्रमांक,कु.सानप निकिता वसंत एकूण टक्के – ७४.७६ % मिळवून द्वितीय क्रमांक,मोहिते ईश्वर वसंतराव एकूण टक्के – ७४.१५%मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,उपाध्यक्ष रामदास होन,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,चंद्रशेखर कुलकर्णी संदीप रोहमारे,सुजित रोहमारे संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.नारायण बारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.