जाहिरात-9423439946
शैक्षणिक

महाविद्यालयातील विद्यार्थिनींना विषबाधा ?

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील ईशान्यगडाशी संबंधित असलेल्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास दूषित पाण्यामुळे जवळपास शंभर विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्या असून त्यांना त्यांच्या नजीकच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.तर काहींच्या माहितीनुसार ही विषबाधा असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व छायाचित्रे संकल्पित.

“आपण चार दिवसापासून बाहेरगावी असून याबाबत आपल्याला नुकतीच प्राचार्य यांनी माहिती दिली आहे.बऱ्याच विद्यार्थ्याना बाहेरचे जेवणाचे डबे सुरू असून त्यामुळे हा त्रास असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.तुमचा फोन आल्यावर मी माहिती घेत होतो.पूर्ण माहिती घेतल्यावर मी आपल्याला सविस्तर माहिती देतो”-अमित कोल्हे, विश्वस्त,संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था, सहजानंदनगर.

    राज्यात पुणे,बुलढाणा आणि सोलापूरसह विविध ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विषबाधेच्या घटना (अन्न,दूषित पाण्यातून विषबाधा) समोर आल्या आहेत.दूषित पाणी आणि निकृष्ट अन्नामुळे उलट्या,मळमळ आणि चक्कर येऊन अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत.अनेक घटनांमध्ये,विशेषतः वसतिगृहात,प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे.मात्र बऱ्याच संस्था या हि माहिती दडविण्यात स्वतःला धन्य मानताना दिसत आहे.अशीच घटना काल सायंकाळी ईशान्यगडाच्या संबंधित शिक्षण संस्थेत कोपरगाव शहरापासून सुमारे अडीच कि.मी.अंतरावर घडली असून त्यात काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास अनेक विद्यार्थिनींना त्रास जाणवू लागला होता.त्यामुळे महाविद्यायातून भरभरून अनेक विद्यार्थिनी त्यांच्याच संस्थेच्या रुग्णालयात भरती करण्यासाठी जाताना अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्यामुळे याबाबत विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे.

“या घटनेत केवळ चौदा मुलींना त्रास जाणवला असून त्याचे कारण त्यांनी ” आमच्या विद्यापीठात बऱ्याच वर्गात वातानुकूलित वर्ग असून काही विद्यार्थी उन्हात बाहेर पडत असतात.तर बऱ्याच जणांना बाहेरचे जेवणाचे डबे सुरू आहेत.तर बऱ्याच विद्यार्थिनी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळल्या असल्याने त्यांना हा त्रास झाला आहे”-प्रा.साहेबराव दवंगे,प्रसिद्धी प्रमुख,संजीवनी शिक्षण संस्था.

   दरम्यान काही पालकांनी आमच्या प्रतिनिधींना याबाबत दूरध्वनी करून या गंभीर घटनेची माहिती दिली आहे.त्यावर आमच्या प्रतिनिधीने याबाबत शोध सुरू केला असता.महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या जी.-२ मध्ये पहिल्यांदा ही घटना उघडकीस आली आहे.त्यानंतर जी-४ मध्ये निवासी असलेल्या विद्यार्थिनींना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला असल्याचे दिसून आले होते.त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांचे प्राध्यापक,शिक्षतेकर कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.त्यांनी तातडीने आपल्या रुग्णालयाच्या रुग्णवाहिका बोलावून घेऊन त्रास होणाऱ्या विद्यार्थिनींना ताबडतोब उपचारार्थ दाखल केले आहे.यातील काही मुली उपचार करून आपल्या वसतिगृहात परतल्या आहे.तर अद्याप काहीना सलायन सुरू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने विद्यार्थिनींच्या या विषबाधेबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश बुट्टे यांचेशी संपर्क साधला असता याबाबत त्यांना कोणतीही माहिती असल्याचे दिसून आले नाही.त्या नंतर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेशी संपर्क साधला तो स्थापित होऊ शकला नाही.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने सदर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण चार दिवसापासून बाहेरगावी असून याबाबत आपल्याला नुकतीच प्राचार्य यांनी माहिती दिली आहे.बऱ्याच विद्यार्थ्याना बाहेरचे जेवणाचे डबे सुरू असून त्यामुळे हा त्रास असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.तुमचा फोन आल्यावर मी माहिती घेत होतो.पूर्ण माहिती घेतल्यावर मी आपल्याला सविस्तर माहिती देतो” असे सांगितले आहे.

  दरम्यान काही वेळाने त्यांचे प्रसिद्धी प्रमुख सेवानिवृत प्रा.साहेबराव दवंगे यांचा फोन खणखणू लागला होता.त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी या घटनेची कबुली दिली असून त्यांनी या घटनेत केवळ चौदा मुलींना त्रास जाणवला असल्याचे सांगितले आहे.त्याचे कारण  मात्र त्यांनी अफलातून दिले असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी आमच्या विद्यापीठात बऱ्याच वर्गात वातानुकूलित वर्ग असून काही विद्यार्थी उन्हात बाहेर पडत असतात.तर बऱ्याच जणांना बाहेरचे जेवणाचे डबे सुरू आहेत.तर बऱ्याच विद्यार्थिनी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळल्या असल्याने त्यांना हा त्रास झाला असल्याच्या वेगवेगळ्या सबबी पुढे केल्या असल्याचे दिसून आले आहे.तरीही आम्ही सर्व डबे आणि पिण्याचे पाणी तपासून घेत असतो.बाहेरून आलेले कालच्या डब्यात चना भाजी असल्याचे त्याने कदाचित त्रास झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे.तर याशिवाय उन्हाळा तीव्र झाला असून माणसाच्या शरीरात पाणी कमी (डिहायडड्रेशन) झाल्याने असा त्रास होऊ शकत असल्याचे सांगितले आहे.त्यांचेवर उपचार सुरू असून काहीना त्यांचे वसतिगृहात सोडले असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.तर पहिली घटना कधी उघडकीस आली याचे उत्तर मात्र त्यांना देता आले नाही असे दिसून आले आहे.मात्र वस्तीगृहाच्या क्रमांक जी -२ आणि जी -४ असल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितल्यावर त्यांची मात्र भंबेरी उडाली असल्याचे दिसून आले आहे.मात्र एवढ्या मोठ्या संख्येने विषबाधा ही मात्र दूषित पाण्याने होऊ शकत असल्याचे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.अशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.या पूर्वीही सन-२०२३ साली अशीच घटना दूषित पाण्याचे घडली असल्याची माहिती काही पालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  दरम्यान आमच्या प्रतिनिधीने विद्यार्थिनींच्या या विषबाधेबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश बुट्टे यांचेशी संपर्क साधला असता याबाबत त्यांना कोणतीही माहिती असल्याचे दिसून आले नाही.त्या नंतर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेशी संपर्क साधला तो स्थापित होऊ शकला नाही तथापि पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनाही या गंभीर प्रकरणाबाबत कोणतीही माहिती असल्याचे दिसून आले नाही.”याची माहिती घ्यावी लागेल असे सांगून आपण ती घेतो” असे अंगातले आहे.त्यामुळे पालकांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.या महाविद्यालयात जवळपास १० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे माहिती असून शैक्षणिक दर्जा चांगला टिकवला आणि वाढवला असल्याचे दिसून आले आहे.मात्र या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामाऱ्या,आत्महत्या,आंदोलने दडपून टाकण्याचा घटना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या घटना लोकशाहीला नख लावणाऱ्या ठरत आहेत हे विशेष !विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रशासन मात्र त्या दडपण्याचे कोतेपणा दाखवत आहे त्यामुळे या घटनेबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close