शैक्षणिक
….या महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर चर्चासत्र संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ बौद्धिक क्षमता असून चालत नाही तर माणसाला आपल्या भावनांचे योग्य नियोजन करता येणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ.मल्लाप्पा कोडनापूर यांनी केले आहे.

भावनिक बुद्धिमत्ता ई.आय.किंवा ई.क्यू.) म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून,समजून घेऊन,योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची क्षमता होय.यामध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे,ताण कमी करणे,सहानुभूती बाळगणे आणि इतरांशी प्रभावी संवाद साधून नातेसंबंध सुधारणे यांसारख्या कौशल्यांचा समावेश होतो,जी यशासाठी महत्त्वाची आहेत.
स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वतःची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.भावनिक बुद्धिमत्ता ई.आय.किंवा ई.क्यू.) म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून,समजून घेऊन,योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची क्षमता होय.यामध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे,ताण कमी करणे,सहानुभूती बाळगणे आणि इतरांशी प्रभावी संवाद साधून नातेसंबंध सुधारणे यांसारख्या कौशल्यांचा समावेश होतो,जी यशासाठी महत्त्वाची आहेत.त्यावर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर त्यांचा त्यांना भविष्यात आणि आयुष्यात उपयोग होतो.त्यामुळेच कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशिलामाई काळे महाविद्यालय कोळपेवाडी येथे नुकतेच दोन दिवसीय भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते.
सदर प्रसंगी डॉ.विशाल सांगळे,डॉ.विद्या जिरागे,डॉ.एस.एन.शेळके,डॉ.तुशाबा शिंदे,डॉ.एस.जी.कोंडा आणि डॉ.डी.के.मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर चर्चासत्रामध्ये सर्व मार्गदर्शकांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगितली.दैनंदिन जीवनातील ओळखीची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले की,”भावनिक बुद्धिमत्ता ही काही क्लिष्ट गोष्ट नसून ती आपल्या वागण्या-बोलण्याचा आणि विचारांचा भाग आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत यश मिळवतानाच स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांना कसे सामोरे जावे.ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि इतरांच्या भावनांचा आदर ठेवून संवाद कसा साधावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चासत्रात वैशिष्ट्य पूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले गेले.वेगवेगळ्या राज्यांमधील आणि विविध महाविद्यालयांमधील संशोधकांनी पाठवलेल्या दर्जेदार संशोधन लेखांचे संकलन करून एका विशेष संशोधन पत्रिकेचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या पत्रिकेमुळे भविष्यातील अभ्यासकांसाठी भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नवे पैलू खुले होणार आहेत.हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.विजया गुरसळ व निरीक्षक नारायण बारे,प्रा.पांडुरंग मोरे,प्रा.विनोद मैंद,डॉ.संतोष जाधव,प्रा.उमाकांत कदम व प्रा.पंकज वाबळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमप्रसंगी राज्यासह देशातील संशोधक विद्यार्थी,विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच भावनिक बुद्धिमत्ता या विषयाशी संबंधित सर्व क्षेत्रातील व्यक्ती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



