शैक्षणिक
…या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी भराविण्यात आलेला बाल आंनद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाल आनंद मेळावा म्हणजे मुलांच्या आनंद आणि शिक्षणासाठी आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम,जिथे विद्यार्थी खेळ,खाद्यपदार्थ स्टॉल्स,विविध कला आणि हस्तकला वस्तूंच्या विक्रीतून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतात.सर्जनशीलता शिकतात आणि ‘कमवा व शिका’ या तत्त्वाची जाणीव करून घेतात.
बाल आनंद मेळावा म्हणजे मुलांच्या आनंद आणि शिक्षणासाठी आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम,जिथे विद्यार्थी खेळ,खाद्यपदार्थ स्टॉल्स,विविध कला आणि हस्तकला वस्तूंच्या विक्रीतून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतात.सर्जनशीलता शिकतात आणि ‘कमवा व शिका’ या तत्त्वाची जाणीव करून घेतात.ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद मिळतो.हे मेळावे शाळांमध्ये, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये,उत्साहपूर्ण वातावरणात साजरे होतात. कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या वेळी शाळेतील विद्यार्थी समवेत माजी विद्यार्थी,पालक,शालेय व्यवस्थापन समिती यांनीही मोठा सहभाग नोंदविला होता.शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थामध्ये सामाजिक,आर्थिक,व्यावाहारिक ज्ञान संपादित व्हावे या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील विद्यार्यांनी जीवनावश्यक वस्तु पालेभाजी,खाद्यपदार्थ असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.या बाल आनंद मेळाव्या प्रसंगी शाळेतील माजी मुख्याधापक चंद्रशेखर कडवे,गव्हाणे एस.के.लामखडे एम.जी.रणादिवेएस.के.,शिंगाडे,ए.जे.,राठोड,एस.एम.,दिघे,डी.पी.,साबळे,डी.एल.,दिघे,एस.व्ही.,भोसले एस.एस.आदी शिक्षकांनी बाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहे.



