शैक्षणिक
विज्ञानाला समाजाचा पाठिंबा असण्याची गरज -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासारख्या मोठ्या उपक्रमातून शाळा,महाविद्यालयाबरोबरच समाजाने देखील पाठिंबा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य दूध संघाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.

“कोपरगाव तालुक्यातील बालवैज्ञानिकांच्या कल्पना शक्तीला वाव देणाऱ्या या प्रदर्शनामध्ये तालुक्याच्या तब्बल २५० शाळांमधून ३५० उपकरणांची मांडणी करण्यात आलेली आहे.यात प्लास्टिक,कचरा व्यवस्थापन,ए.आय.तंत्रज्ञान आदीचा समावेश दिसून आला आहे”-शबाना शेख,प्रभारी शिक्षणाधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
कोपरगाव पंचायत समिती,विज्ञान,गणित, कला अध्यापक संघ व के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ५३ व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित,कला व पर्यावरण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,माजी नगरसेवक सत्येन मुंदडा, प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,डॉ.दिपक बुधवंत,श्री निळकंठ,गट विकास अधिकारी संदीप दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
. त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील बालकांना या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने के.जे.सोमैया सारखे महाविद्यालय बघण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमैया महाविद्यालयाचे तसेच अशा चांगल्या उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल तालुका शिक्षण विभागालाही त्यांनी धन्यवाद दिले आहे.कारण अशा बाल वैज्ञानिकांमधूनच उद्याचे डॉ.अब्दुल कलाम घडू शकतील असा सार्थ विश्वास वाटत असल्याचे शेवटी म्हटले आहे.
या समारंभाचे प्रास्ताविक करताना कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख म्हणाल्या की,”कोपरगाव तालुक्यातील बालवैज्ञानिकांच्या कल्पना शक्तीला वाव देणाऱ्या या प्रदर्शनामध्ये तालुक्याच्या तब्बल २५० शाळांमधून ३५० उपकरणांची मांडणी करण्यात आलेली आहे.यात प्लास्टिक,कचरा व्यवस्थापन,ए.आय.तंत्रज्ञान आदी बाबींचा समावेश दिसून येतो.अत्यंत कमी कालावधीत या अशा विज्ञान प्रदर्शनाचे कौतुकास्पद नियोजन केल्याचे गौरोद्धार त्यांनी काढले आहे.
दरम्यान तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपकरणाची निर्मिती करणाऱ्या गोधेगाव शाळेचा बाल विद्यार्थी कार्तिक कैलास साळुंके व त्याचे मार्गदर्शक श्री.कुंदे सर यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब सोनवणे,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आदींनी परिश्रम घेतले आहे.
या समारंभाचे सूत्रसंचालन गोरखनाथ चव्हाण यांनी तर महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे तर आभार योगेश सावळा यांनी मानले आहे.



