जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या संस्थेत,’अभियंता दिन’ उत्साहात साजरा

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 

  कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

  

  “रोजच्या जीवनातील प्रत्येक सोयी-सुविधा यामध्ये रस्ते,पूल,वीज,पाणीपुरवठा,यंत्रसामग्री,इंटरनेट सेवा यांचा पाया अभियंतेच घालतात.त्यामुळे देशाच्या प्रगतीत त्यांचा देखील मोठा वाटा आहे.गौतम पॉलीटेक्निकमध्ये वर्षभर नेहमीच असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास केला जातो”-सुभाष भारती,प्राचार्य,गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट,कोळपेवाडी.

  भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) साजरा केला जातो,जे महान अभियंते आणि भारतरत्न सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त असतो. हा दिवस अभियांत्रिकी क्षेत्रातील नवोपक्रम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित करतो आणि अभियंत्यांचे योगदान साजरे करतो.हा दिवस अभियंत्यांच्या योगदानाची कदर करण्यासाठी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन कल्पना आणि मेहनतीचे महत्त्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो.तो कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी या ठिकाणी असलेल्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

   सदर प्रसंगी संस्थेचे शैक्षणिक निरीक्षक प्रा.नारायण बारे कार्यालय अधीक्षक अण्णासाहेब बढे आदिसंह प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.

   त्यांनी रोजच्या जीवनातील प्रत्येक सोयी-सुविधा यामध्ये रस्ते,पूल,वीज,पाणीपुरवठा,यंत्रसामग्री,इंटरनेट सेवा यांचा पाया अभियंतेच घालतात.त्यामुळे देशाच्या प्रगतीत त्यांचा देखील मोठा वाटा आहे.गौतम पॉलीटेक्निकमध्ये वर्षभर नेहमीच असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल यावर भर दिला जातो.त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना रुजवण्याची आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सुभाष भारती यांनी केले तर सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु.रोशनी वाणी व कु.दिपाली मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सादिक शेख यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close