शैक्षणिक
…या प्रशिक्षण संस्थेत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

अलीकडे भारतीय तरुण जर्मनीत आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने जाताना दिसत असून त्यांना तेथे संपर्क साधण्यास ही भाषा निर्णायक ठरू शकते या शिवाय देशात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढत असून त्या भाषेत संपर्क केल्याने त्यांना त्या देशाबद्दल आदर वाढतो असे दिसून आले आहे.त्यामुळे अनेकांचा जर्मन भाषा शिकण्याकडे कल वाढ असताना दिसून येत आहे.
जर्मनीची अधिकृत भाषा जर्मन आहे .देशातील ९५ टक्क्यांहून अधिक लोक मानक जर्मन किंवा जर्मनची एक बोली त्यांची पहिली भाषा म्हणून बोलतात.या आकडेवारीत नॉर्दर्न लो सॅक्सन भाषिकांचा समावेश आहे,ही एक मान्यताप्राप्त अल्पसंख्याक किंवा प्रादेशिक भाषा आहे जी आकडेवारीमध्ये मानक जर्मनपेक्षा वेगळी मानली जात नाही.अलीकडे भारतीय तरुण जर्मनीत आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने जाताना दिसत असून त्यांना तेथे संपर्क साधण्यास ही भाषा निर्णायक ठरू शकते या शिवाय देशात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढत असून त्या भाषेत संपर्क केल्याने त्यांना त्या देशाबद्दल आदर वाढतो असे दिसून आले आहे.त्यामुळे अनेकांचा जर्मन भाषा शिकण्याकडे कल वाढ असताना दिसून येत आहे. ती त्रुटी दूर करण्यासाठी साईबाबा संस्थानने ही भाषा शिकण्यास प्राधान्य दिले असून तसे वर्ग सुरू केले आहे.
या प्रसंगी शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज,प्राचार्य अभयकुमार दुनाखे,गट निदेशक दादा जांभुळकर,विविध विभागांचे निदेशक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी गाडीलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”संस्थेत प्रशिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व आर्थिक दुर्बल कुटुंबांतील आहेत.जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना तिथे भाषा अडसर ठरत आहे.बाहेर जर्मन भाषा शिकण्याचा खर्च मोठा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे कठीण होते.ही अडचण ओळखून संस्थानने विनामूल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे आणि यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे.विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन परदेशी रोजगाराच्या संधी स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे यांनी प्रास्ताविक केले तर जर्मन भाषा प्रशिक्षक अभिजित धावडे यांनी विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची माहिती दिली.गट निदेशक दादा जांभुळकर यांनी आभार मानले, तर विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले आहे.